शिक्षणामुळेच स्त्री सक्षम होईल …सुनीता कुसनाके
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
मुलचेरा ….येथील वीर बाबुराव शेडमाके सभागृहात आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिना निमित्त आयोजित समारंभात बोलताना, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व ओळखून स्त्री शिक्षणाचा प्रारंभ केला त्यामुळे आज स्त्रिया शिकून पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत.त्यामुळे उच्चशिक्षण घेऊन स्त्रियांनी स्वतःची प्रगती साधली पाहिजे असे मुलचेरा नगरपंचायत चे नगरसेविका तथा गटनेत्या,आदिवासी विद्यार्थी संघाचे महिला नेत्या सुनिता कुसनाके यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी मंडळ अधिकारी सुतार मॅडम यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. स्मिता चापले प्रा . चंद्रकला गजभिये जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुनिल आत्राम, ग्रामपंचायत सदस्य आम्रपाली प्रफुल् दुर्गे . ग्रामपंचायत सदस्या प्रतिमा डोर्लीकर, माजी ग्रामपंचायत सदस्या ज्योतीताई सोनुले, बोडावार मॅडम ,पोलीस पाटील उषाताई पेंदाम ,नगरसेविका मनीषा गेडाम , गृहपाल प्रणाली मेश्राम , नगरसेवक बंडू आलाम. देवनाथ बोबाटे , तिरुपती मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन निकीता डोंगरे यांनी केले तर आभार पोर्णिमा वाळके यांनी मानले . रमाई बचत गट मुलचेरा व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा मुलचेरा यांनी संयुक्त आयोजित कार्यक्रमाचे यशस्वीते करीता वनिता संतोष उराडे, दर्शना राजकुमार डोर्लीकर , प्रेमिला डोर्लीकर , मायाबाई डोर्लीकर , कविता मेश्राम , प्रेरणा डोंगरे , दमयंता करमे ,माया रामटेके. रुपा वाघाडे , भाग्यश्री डोंगरे . मालता डोंगरे , गिता पल्लो , डोनारकर , कल्पना आत्राम, लता बंडावार,संगीता मडावी, यांनी विषेश सहकार्य केले .