‘त्या’ घटनेतील मृतकाच्या कुटुंबाला अजयभाऊ कंकडालवार कडून आर्थिक मदत…!
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क…. प्रतिनिधी….
अहेरी : तालुक्यातील मांड्रा येथील महिलेचा तिच्याच पतीने हत्या करून ठार केल्याची घटना १७ जुलै रोजी घडली.दरम्यान या घटनेची माहिती होताच काँग्रेसनेते व जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी रुग्णालयात भेट देऊन विचारपुस करीत कुटुंबाला आर्थिक मदत केली.
रतनीबाई सदाशिव नैताम व सदाशिव नैताम हे पती पत्नी आपला संसार चालवीत असताना त्यांचे वारंवार भांडण होत असतं.दरम्यान काल बुधवारी त्यांचे कडाक्याचे भांडण झाले असता,सदशिवने आपली पत्नी रतनीबाई ची क्रूर हत्या केली.घटनेनंतर तिचा मृतदेह अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असता. या घटनेची माहिती जि.प.माजी अध्यक्ष कंकडालवार यांना मिळताच त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मृतक महिलेची शविच्छेदन होत पर्यंत थांबून मृतदेह घरी पोहचण्यासाठी तसेच अंत्यविधी कार्यक्रमासाठी त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,सरपंच विलास मडावी,माणिक मडावी,स्वामी दुर्गे,विजय दुर्गे,महादेव मडावी,नरेंद्र गर्गमसह आदी उपस्थित होते.