आल्लापल्ली
अहेरी विधानसभा क्षेत्रातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या…!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…प्रतिनिधी…,
अहेरी : मागील ५-६ दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात आणि अहेरी विधानसभा क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.अतिवृष्टीने आणि पुरजन्य परिस्थितीमुळे विधानसभा क्षेत्रात शेतकरी वर्गासह सर्वसमण्या नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे . सदर नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन हवालदिल झालेल्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी म्हणून आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी शासनाकडे केली आहे.
- अहेरी विधानसभा क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते बंद पडल्याने यात प्रवाश्यांना नाहक त्रास होत आह.अतिवृषटीमुळे अनेकांची घरांची पडझड झाली आहे तर काहींच्या दुकानात पाणी शिरले,तसेच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून असल्याने शेतकऱ्यांचेही पिकांचे नुकसान झाले आहे. याची दखल घेत आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्याचा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.