अहेरी तालुका

आल्लापल्ली येथील अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांनी घेतली माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांची भेट…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

आलापल्ली : महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळ तर्फे मौजा
आलापल्ली येथे पक्के बसस्थानक बांधण्यात करण्यात आले आहे.या झालेल्या
बसस्थानकामुळे निश्चीतच गावाची शोभा वाढणार गावाचा विकास होणार तसेच
प्रवाशांना सुखकर आणि सोईस्कर होणार.बस स्थानकाच्या कृपनलिका समोर गेल्या ३५ ते ४० वर्षापासुन येथिल गरीब अ.जाती,अ.जमाती व इतर प्रवर्गातील तसेच दारिद्ररेषेखालील भुमिहिन लहान
व्यावसायीक चर्म उदयेग (चप्पल दुकान) भोजनालय,फळ दुकाने,चाय दुकान,मोबाईल
रिचार्ज दुकान,जनरल स्टोअर्स,छोटे कपडे दुकान तसेच पान टपरी इत्यादी व्यावसायीक
आपला व आपल्या कुटुंबाचा उदर्निवाह करीत आहेत.तसेच शासनाने ठरविलेले कर
(गृह कर,पानी कर,गुजरी कर इ.) नियमित वेळोवेळी भरण्यात येत आहेत.बसस्थानकाच्या कूपनलिकेचे बांधकाम कामाकरीता समोरील जागेत ३५ ते ४० वर्षापासुनचे सुरू असलेले व्यवसाय धारकांना ऐन पावसाळ्याच्या काळात अतिक्रमन काढण्यास. दि.०४/०७/२०२३ ला देवुन दि. ०६/०७/२०२३ पर्यंत आपले अतिक्रमन काढुन घ्यावे मा. म.रा.मार्ग परीवहन महामंडळ, गडचिरोली विभाग,अहेरी
आगार यांच्याकडुन नोटीस देण्यात आलेले आहे.ऐन पावसाळ्याच्या व्यावसायीकांचे अतिक्रमन काढुन बेरोजगारीचा सामना करावा लागेल तसेच आर्थिक टंचाईमुळे आमचे मुला बाळाचे शिक्षणाकरीता लागणारे साहीत्य खरेदीस तसेच त्यांच्या योग्य शिक्षणात अडचण निर्माण होईल.त्यामुळे आमच्यावर तसेच आमच्या कुटुंबाबर उपासमारीची व बेरोजगारीची समस्या उद्भवत आहे.तरीपण महोदय आपल्याकडुन संबंधीत जागेवर असलेले जुणे व्यावसायीकांना बेरोजगार न करता आम्हाला रोजगाराची
संधी उपलब्ध करून दयावे.तथा आमचे कोणतेही प्रकारचे या बसस्थानकाच्या
कोणत्याही विकास कामाला विरोध नाही तसेच आमचे संपुर्ण सहकार्य आहे.

बसस्थानकाच्या कूपनलिकेचे बांधकाम करीत असताना बसस्थानकाच्या वेन्ही बाजुला व समोरील मध्यवर्ती भागात दुकान
गाडे,चाळ काढली तर त्यामध्ये आपल्याच विभागाला याचा आर्थिक फायदा होणार.दुकान गाडे,चाळ काढुन संबंधीत जागेवरील जुन्या व्यावसायीकांना ते गाडे, किंवा व्यवसायीक चाळ कमीत कमी दरामधे मासीक भाडेतत्वावर उपलब्ध करून दिल्याने आमच्यावर बेरोजगारीची व उपासमारीची वेळ येणार नाही तसेच आपल्या विभागात
आर्थिक बाबीत भर पडणार किंवा बसस्थानकाच्या संरक्षण कूपनलिकेच्या बाजुने
आम्हाला व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी.त्यामुळे आपल्या विभागाकडुन
प्रवाशांना अधिकच्या सोईसुविधा उपलब्ध करण्यात मदत होणार.आम्हाला पावसाळ्याचा कालावधी संपेपर्यंत आम्हा सर्व व्यवसायीकांना अवधी देण्यात यावे.आमच्या हालाकीच्या परीस्थीतीचा आणि विनंतीचा विचार करून योग्य
तो निर्णय घ्यावा.म्हणून आलापल्ली समस्त नागरिकांनी आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे विदर्भ नेते, माजी जि.प.अध्यक्ष,अहेरी बाजार समिती सभापती श्री. अजय कंकडालवार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.कंकडालवार यांनी अहेरी आगार प्रमुखांची भेट देऊन म्हंटले की सद्या बस्थानकचे काम सुरु आहे.बस्थानकचे बांधकाम आता होत नाही.होईल त्या वेळी आपण न सांगता पण दुकान दारकांनी दुकान काढतील पण ह्या पावसाळ्यात दुकाणे काडून जा म्हंटले तर ते कुठे जाणार म्हणून अहेरी आगार प्रमुखांची चर्चा करून ह्या विषयावर काही तरी तोळगा काडून पावसाळा संपेपर्यंत स्थानिक दुकानंदारावर अन्याय करून अतिक्रमण काढु नका ,असे अहेरी आगार प्रमुखांसोबत चर्चादरम्यान सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close