अहेरी तालुका

माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून कोंडागुर्ला परिवाराला आर्थिक मदत

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

◆अहेरी◆:तालुक्यातील मल्लमपल्ली येथील सुशिक्षित बेरोजगार युवक रमेश कोंडागुर्ला आपल्या क्षेत्रात हाताला रोजगार मिळत नाही म्हणून पुणे येथे काम करण्यास गेला असता त्याचा तिथे अपघाती निधन होते.घरची परिस्थिती खूप हलाकीची त्यात रमेश कोंडागुर्ला यांचे शव पुणे येथे होते.या परिस्थिती मध्ये वसंत कोंडागुर्ला यांनी भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आपली परिस्थिती सांगीतल्यावर माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी पुणे येथील पोलीस विभाग व आरोग्य विभागासोबत संपर्क करून शव मल्लमपल्ली येथे आणण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून घरच्या लोकांना पुणे येथे जाण्यासाठी आर्थिक मदत केले .* *या वेळी आविस चे नागेपल्ली माजी सरपंच दिवाकर मडावी,नागेपल्ली ग्राम पंचायत सदस्य आशिष पाटील,मल्लमपल्ली पोलीस पाटील किशोर सिडाम,जीवन दुर्गे जुलेख शेख,विनोद कावेरी माजी सरपंच विजय कुसनाके उपस्थित होते.कोंडागुर्ला परिवारावर आलेल्या संकटात माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मल्लमपल्ली येथील जनतेंनी त्यांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close