लॉयड्स व मेटल कंपनीकडून नियमबाह्यरित्या सुरू असलेले रस्ता रुंदीकरणाचे बांधकाम तात्काळ थांबविण्याची मागणी …!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
खमनचेरू,तानबोडी, विजयनगर, या गावातील नागरिकांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती यांच्या नेतृत्वात मा.मुख्यकार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांना निवेदन
सदर डांबरीकरण चे काम बोटलाचेरू, तानबोडी, वेलगुर हा नवीन रस्ता जिल्हा परिषद ३०५४ अंतर्गत व प्रधानमंत्री सडक योजनेचे काम नुकतेच पुर्ण झाले असल्याने आपल्या स्वार्थासाठी लॉयड्स व मेटल कंपनीने चालू केलेले काम तात्काळ थांबविण्याची मागणी!
अहेरी:- जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम करण्यात आलेले रस्ते कंपनीला देऊ नये, कारण गेल्या काही वर्षापासुन हे रस्ते प्रलंबित होते परंतु नुकतेच १ महिन्याअगोदर जिल्हा परिषद अंतर्गत दुरूस्ती व नवीन बांधकाम हे पुर्ण झालेला आहे त्यामुळे त्या रस्त्यांना लॉयड्स मेटल कंपनी ला देऊ नये. सदर रस्ते हे अवजड वाहनांना रहदारी करीता नसून नागरिकांना व कमी क्षमतेच्या वाहनांना ये-जा करण्याकरीता बनविला आहे. परंतु आपल्या जिल्हा परिषद ला वेलगूर ग्रामपंचायत व किष्टापुर ग्रामपंचायत तर्फे ६ महिन्याअगोदर ग्रामसभेच्या ठरावा सहित निवेदन दिले होते की, त्या रस्त्याचे रूंदीकरण करण्यात येवू नये व कंपनीचे जड वाहने त्या रस्त्यावरून जाऊ नयेत. परंतू दिनांक २३/०७/२०२३ ला सर्वसाधारण सभेत रस्ता मंजूर करून रूंदीकरण व दुरूस्ती करण्याकरीता लॉयड्स अँड कंपनी घुग्गुस यांना परवानगी देण्यात आली आहे.
त्याप्रमाणे त्यांना परवानगी मिळाल्यामुळे त्यांच्यातर्फे रस्ता रुंदीकरण व दुरूस्ती करण्याचे काम चालू आहे व त्यानंतर त्या रस्त्याने हजारो जड वाहने लोहखनीज वाहतूक करण्याकरीता चालू होणार आहेत. त्या वाहतूकीमुळे आजुबाजूच्या गावातील नागरिकांना खुप त्रास होणार आहे. कारण लोहखनीज वाहतूक करणाऱ्या हजारो वाहनांमूळे त्या रस्त्याने नागरिकांना ये-जा करणे कठीण होईल व त्या वाहनांच्या धुळीमुळे रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान होईल व रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या गावातील लोकांना सुद्धा धुळीमुळे दम्याचे आजार व इतर रोगराई उद्भवणार असल्याची शक्यता सांगता येणार नाही. तेच धुळमिश्रीत पिण्याचे पाणी तेथील नागरिक व जनावरे पित असल्यामूळे त्यांना कित्येक रोगांचा सामना करावा लागणार आहे.
तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा त्या रस्त्याने लोहखनीज वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे शैक्षणिक नुकसान होणार आहे. आणि असे कित्येक समस्या उद्भवण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कंपनीला दिलेली रस्ता रूंदीकरण व दुरूस्तीची परवाणगी रद्द करण्यात यावी. कारण आत्ताच मद्दीगुडम, आलापल्ली, बोरी, खमणचेरू, लगाम ते आष्टी पर्यंतचे ३५३ चे रस्ते लोहखनीज करणाऱ्या हजारो वाहनांमुळे पुर्णपणे खराब झाले आहेत. त्या रस्त्याने दुसरे वाहन ये-जा करीत असतांना खुप अडचणी येत आहेत. त्यामुळे ज्या समस्या सध्याच्या परिस्थिती मध्ये मद्दीगुडम ते आष्टी या रस्त्याची व तेथील नागरिकांना जो त्रास सहन करावा लागत आहे, त्याचप्रकारचा त्रास बोटलाचेरू, तानबोडी, आणि वेलगुर वासीयांना सुद्धा होणार आहे.
त्याचप्रमाणे खमणचेरू येथे हजारो लोहखनीज वाहतूक करणाऱ्या वाहनांची पार्किंग करीत आहेत. परंतू त्यासाठी त्यांनी सदर ग्रामपंचायत ची परवाणगी घेतलेली नाही व त्याठिकाणी शौचालय उपलब्ध नसल्याने लोहखनी वाहतूक करणारे वाहनधारक व मजूर हे उघड्यावर शौचाला जाणे व ग्रामपंचायत च्या बोरवेल वर उघड्यावर आंघोळ करणे अशा प्रकारचे कृत्य करीत आहेत. आजूबाजूच्या परिसरात आदिवासी आश्रम शाळा असून तेथील वस्तीगृहात मुले-मुली वास्त्यव्यास असतात, आणि त्यांच्या या कृत्यामुळे त्यांच्यावर गंभीर परिणाम होत आहे व रोगराई पसरण्याची संभावना आहे.
त्यामुळे या परिसरातील नागरिकांना होणाऱ्या समस्यांचा विचार करून त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कंपनीला दिलेली रस्ता रूंदीकरण व दुरूस्तीची परवाणगी रद्द करून ज्याप्रकारची परिस्थिती अनेक मोर्चे, आंदोलने, आमरण उपोषण व साखळी उपोषण करून सुद्धा मद्दीगुडम, आलापल्ली ते आष्टी मार्गावरील रस्त्याची व नागरीकांची समस्या जैसे थे आहे. त्याचप्रकारची परिस्थिती बोटलाचेरू, तानबोडी, आणि वेलगुर वासीयांना सुद्धा होणार आहे. त्यामुळे आपण ह्या समस्यांचा विचार करून तेथील नागरिकांना योग्य न्याय द्यावा.अशी निवेदन देण्यात आली आहे.
निवेदन देताना माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजय कंकडालवार सहित अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,माजी सभापती सौ.सुरेखा आलाम,माजी जि.प.सदस्य श्री.अजय नैताम,माजी जि.प.सदस्या कु.सुनीता कुसनाके,खमनचेरू चे सरपंच श्री.शायलू मडावी,गुरुदास मडावि,समाया मडावी,बंडु मडावी,मारोती मडावी,नागेश गेडाम,मधुकर मडावी,तानबोडीचे रामकुमार शेंडे,महेश मडावी,अभय वाढई,सुधाकरन भोयर,पोचा चौधरी,अनुज मडावी,आकाश आदे,शैलेश शेंडे,रवि धानोरकर आदि उपस्थित होते