विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क….. प्रतिनिधी….
राजुरा…..चुनाभट्टी वार्ड राजुरा येथील श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री.छत्रपती गेडाम व सौ.लक्ष्मीताई गेडाम यांचे कुटुंबाने राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचा 56 वा पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन त्याचे निवासस्थानी केले.यावेळी सामुदायिक प्रार्थनेकरीता मा.बळीराम बोबडे,लटारु मत्ते,मनोहरराव बोबडे,रत्नाकर नक्कावार,गजेंद्र ढवस,बंडुभाऊ सरपंच गोयेगाव,चहारे,सातपुते,सौ.लताताई ठमके,सौ.गाडगे,शकुंतला दवंडे,सौ.बांगडे,सुधाताई चिडे,भार्गव चिडे तसेच नातेवाईक,आप्तेष्ट व श्री गुरुदेव सेवा मंडळ जवाहरनगर,चुनाभट्टी वार्ड भजनी मंडळींची उपस्थिती होती,यावेळी ॲड.राजेंद्र जेनेकर, ॲड.सारीका हिरादेवे-जेनेकर,चैतन्य व प्रगती जेनेकर कुटुंबाचे वतीने गेडाम कुटुंबीयांचे स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली व त्यांना “राष्ट्रसंत साहित्य ” भेट स्वरुप दिले त्यावेळी मधुकरराव भगत,श्रीहरी ठमके,श्री.पवार,धनश्याम मेश्राम,लोमेश मडावी आदींची उपस्थिती होती.महाप्रसादानंतर भजनाचे आयोजन करण्यात आले,या स्तुत्य उपक्रमाची दखल घेत सर्वांनी गेडाम कुटुंबीयांचे कौतुक केले.