पुसुकपल्ली नागरिकांना मिळणार आता शुद्ध पिण्याचे पाणी …!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय नागेपल्ली अंतर्गत येत असलेल्या पुसुकपल्ली येथील गढूळ पाणी असून नागरिकांना आजार झाले होते.नागरिकांना शुद्ध पिण्यांचा पाणी मिळावे म्हणून नागरिकांनी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडे मागणी केली आहे.कंकडालवार यांनी १५ व्या वित्त जिल्हा परिषद गडचिरोली स्तर अंतर्गत शुद्ध पिण्याचं पाण्याची जलशुद्धिकरण केंद्र मंजूर करण्यात आली.सदर बांधकामाच्या भूमिपूजन दि.18/09/2022 ला करण्यात आले होते.आज शुध्दीकरण केंद्राचे काम पूर्णत्वास आल्याने आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.तसेच पुसुकपल्ली गावातील नागरिकांना वॉटर ATM माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत नागेपल्ली सरपंच लक्ष्मण कोडपे,उपसरपंच रमेश शानगोडावार,सदस्य मंजुषा गावडे,शेवंता भोयर,राकेश कुळमथे बाजार समिती सचालक तथा ग्रामपंचायत सदस्य नगेपल्ली,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,रवींद्र भोयर,अविका सोसायटी अध्यक्ष,शामराव कुळमेथे,शाळा समिती अध्यक्ष रामदास चौधरी,पेस समिती अध्यक्ष रमेश डोके,बाबुराव चौधरी,अशोक चौधरी,परदेशी डोके,रमलू चौधरी,प्रभाकर चौधरी,नागुलु येल्लुर,संतोष केरकर,संतोष येलुर,शकर कटेल,सत्यवान जावदे,किशोर जवादे,वेंकठी कल्याडम,रमेश भोयर,मोहनेश भोयर,सुधाकर जनकपुरे,दिवाकर जनकपुरे,बापू आत्कुवार,शंकर आत्कुरवार,विनोद मधुकर,भोयर बाबुराव तोराम्म, विनोद रामटेके,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते तसेच नागरी उपस्थित होते