सिरोंचा-असरअल्ली महामार्गावर होणाऱ्या अपघातांना सा.बां.विभाग व प्रशांत कंट्रक्शन कंपनी नागपूर जबाबदार असून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
सिरोंचा :- सिरोंचा-आसरअल्ली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३चे बांधकाम सुरू होऊन ४ ते ५ वर्षे पूर्ण होत आहे.
सिरोंचा ते वडदम गावापर्यत रस्त्याचे काम झाल्याचे दिसून येत आहे.या महामार्गाचे बांधकाम प्रशांत कन्स्ट्रक्शन नागपूर यांच्याकडून करण्यात येत आहे.
सिरोंचा – आसरअल्ली गावापर्यंत सुरू असलेल्या महामार्गाचे बांधकाम वडदम गावापर्यंत झाल्याने पुढे आसरअल्ली गावापर्यंत काम होणे बाकी आहे.
या अर्धवट महामार्गाचे बांधकामामुळे सिरोंचा मुख्यालयात येण्या – जाण्या करणाऱ्यांना महामार्गावरील असलेल्या खड्ड्यात पडून अनेक अपघात होत आहे.महामार्गावर टर्निंग येथे आवश्यक तिथे गतिरोधक ( सूचना फलक )नसल्याने अनेकाना आपले जीव गमवावा लागत आहे.
या गंभीर विषयांवर आम्ही ग्रामस्थांना घेऊन तहसील कार्यालय मार्फत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय सिरोंचा यांच्याकडे ६ मार्च 2023 रोजी निवेदन पाठवून गतिरोधकासह अपूर्ण असलेल्या बांधकाम पूर्ण करण्याची मागणी केर्ली होती.
मात्र संबंधित सिरोंचा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.
सार्वजनिक बांधकाम विभाग सिरोंचाचे अभियंताच्या दुर्लक्षतेमुळे सिरोंचा – आसरअल्ली महामार्गावर आरडा – राजन्नपल्ली येथे ( गतिरोधक ) नसून ८ सप्टेंबर 2023 रोजी, ट्रक आणि दुचाकीचा अपघातात राजन्नपल्ली गावाचे जेष्ठ नागरिक राजन्ना कंबाला या इसमाचे देखील मृत्यू झाली आहे.
आणि दुसऱ्या दिवशी आसरअल्ली येथून सिरोंचा मुख्यालयात येत असताना दुचाकीचे अपघात ही घडून आले. एकाच दिवशी दोन अपघात होऊन गंभीर जखमी देखील झाली आहे.
असे अनेक अपघात या महामार्गावर घडत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंताच्या दुर्लक्षामुळे अर्धवट काम झालेल्या महामार्गावर यापुढेही अनेक अपघात होऊन गरिबांचे जीव गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महामार्गाचे अर्धवट कामामुळे आणि आमच्या मागणीची दुर्लक्षमुळे होत असलेल्या अपघाताचे प्रशांत कन्स्ट्रक्शन नागपूर यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हा दाखल करून त्यांच्या कंट्रक्शन कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे, आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यावर मनुष्यवादाचे गुन्हा दाखल करून त्यांना कार्यकारी अभियंता पदावरून निलंबित करण्यात मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे.
आज पर्यंत महामार्गावर झालेल्या आणि होणाऱ्या अपघाताचे महामार्गाचे कामे करणाऱ्या प्रशांत कन्स्ट्रक्शन नागपूर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेकडून अपघातात जखमी झालेल्या कुटुंबियांना 5 लाख रुपये, तसेच मृतक कुटुंबियांना 10 लाख रुपयांची आर्थिक भरपाई मिळवून देण्यात यावे,मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या १५ दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हा अध्यक्ष – अतुल गण्यारपवर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष – फाजील पाशा तसेच उपाध्यक्ष – सागर मूलकला ,पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बाधित कुटुंबियांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचे इशारा तहसीलदार – सिकतोडे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आली आहे,
त्यावेळी – जिल्हा सरचिटणीस -कृष्णकुमार चोक्कमवार, सचिव – विनोद नायडू, अल्पसंख्याक आघाडीचे – सलमान शेख,सडवली मेडीजेर्ला,राजकुमार मूलकला, गणेश सन्ड्रा, उदय मूलकला, सचिन जनगाम,आणि बाधित कुटुंब उपस्थित होते.