अहेरी तालुका

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून देवलमरी येथील मारीन कुटुंबाला आर्थिक मदत..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी : तालुक्यातील देवलमरी येथील युवा शेतकरी रमेश पोशालू मारीन वय 45 वर्षे यांनी स्वतःच्या शेतात कापूस पिकाला औषधी फवारणी करतांना अचानक पणे त्याचा स्वासाच्या माध्यमाने औषधी पोटात गेल्याने ते आपल्या शेतातुन घाबरलेल्या अवस्थेत घरी आले होते.कुटुंबियांनी रमेश मारीन यांना तात्काळ अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.परंतु उपचार सुरू असताना त्यांना आपला प्राण गमवावा लागला.रमेश मारीन यांची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शवविच्छेदन व शव घेऊन जाण्यासाठी कुटुंबियांना आर्थिक अडचण भासत होती.त्यांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज होती.

देवलमरी येथील आविसं व अजयभाऊ कंकडालवार यांचे कट्टर समर्थक महेश लेकूर व इतर कार्यकर्त्यांकडून माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता त्यांनी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल होऊन मृतांकाच्या नातेवाईकांची आस्थेने विचारपूस करून झालेल्या घटनेचे परिपूर्ण माहिती घेतली व यावेळी त्यांनी शासनाकडून मिळणाऱ्या योजनेमधून काही मदत मृतांच्या वारसांना मिळवून देण्यास प्रयत्न करणार म्हणून मृतकाचे नातेवाईकांना सांगितले मृतांकाच्या नातेवाईकांची अवस्था पाहून स्वतः शवविच्छेदनास व शव स्वगावी नेण्यासाठी अहेरी नगरपंचायत येथील स्वर्गरथ वाहन उपलब्ध करून दिली.तसेच अजयभाऊ कंकडालवार यांनी मारीन कुटुंबियांना आर्थिक मदत केली.पुढील होणाऱ्या कार्यक्रमाला काही आर्थिक अडचण भासल्यास माझाशी संपर्क करा मी शक्यतो मदत करण्यासाठी तत्पर आहे. असे कंकडालवारांनी मृतकाचे नातेवाईक व कुटुंबियांना सांगितले.

अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात कंकडालवार यांचे समवेत माजी जि.प.सदस्य अजय नैताम,नगरपंचायतचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,नगरसेवक महेश बाकेवार,नगरसेवक विलास गलबले,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,श्याम ओंडरे,कुमार गुरनुले,महेश गेडाम,प्रकाश दुर्गे,श्रीनिवास राऊत तसेच आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close