अंगणवाडी केंद्रामध्ये निकृष्ट दर्जाचे पोषण-आहार वाटप करणाऱ्या पुरवठा धारकांवर योग्य कारवाई करा…!
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील मौजा व्येंकटरावपेठा येथील अंगणवाडी क्रमांक 1 मध्ये गरोदर मातांसह अन्य लाभार्थी पोषण आहार घेण्यासाठी आले असता सदर पोषण आहार हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आल्याने लाभार्थ्यांनी पोषण आहार न घेता वापस परतले होते.व्येंकटरावपेठा हा गाव अहेरी तालुक्यातील 5 किमी अंतरावर असून अंगणवाडी केंद्रामध्ये पोषण आहार वाटप करणारे पुरवठादार हे निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप करीत असून हे फक्त या एका अंगणवाडीतील समस्या नसून हे संपूर्ण तालुक्यातील समस्या असून या निकृष्ट आहारामुळे अंगणवाडी केंद्रामधील गरोदर मातांसह लहान मुलांचा जीवाशी खेळण्याची काम पुरवठादार करित आहे ,असे आरोप माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.
अंगणवाडी केंद्रांमध्ये वाटप होणाऱ्या निकृष्ट दर्जाचे पोषण आहार वाटपाची योग्य चौकशी करून संबंधित पुरवठा धारकांवर योग्य कारवाईची मागणी कंकडालवार यांनी निवेदनाद्वारे मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना केली आहे.
संबंधित पुरवठा धारकांवर योग्य कारवाई करून अंगणवाडी केंद्रामध्ये तात्काळ उत्कृष्ट पोषण आहार न केल्यास गरोदर मातांसह अंगणवाडी केंद्रातील लहान बालकांना घेऊन आंदोलन छेडण्यात येईल ,असे इशारा ही कंकडालवार यांनी दिली आहे.
एकीकडे राज्य,केंद्र सरकार व महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत गरोदर मातांसह लहान मुलांमधील कुपोषण दूर करण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत असतांना दुसरीकडे मात्र पुरवठा धारक संबंधित यंत्रणेला हाताशी धरून निकृष्ट दर्जाचे पोषण आहार वाटप करीत सरकारच्या शर्थीना गालबोट दाखवीत आहे.?