अहेरी तालुक्यातील पूरग्रस्तांना तात्काळ आर्थिक नुकसान मिळवून द्या..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी : तालुक्यातील 2022 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामूळे सर्वत्र पुराने कहर केला होता.या पुराची सर्वात जास्त फटका अहेरी तालुक्यातील मोद्दूमडगू – आलापल्ली – नागेपल्लीसह इतर गावातील नागरिकांना बसला होता.या पूर परिस्थितीची महसूल विभागाकडून नुकसान ग्रस्तांची पंचनामे करून राज्य सरकारकडे भरपाईसाठी प्रस्ताव ही सादर केले होते.या प्रस्तावानुसार राज्य सरकारकडून संबंधित विभागाला नुकसानभरपाई देण्यासाठी निधी ही प्राप्त झालेली आहे.असे असताना सुद्धा मागील एक वर्षांपासून पूरग्रस्तांना संबंधित विभागाकडून नुकसान ग्रस्तांना भरपाई मिळालेली नाही.
नुकसानग्रस्त नागरीकांनी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची भेट घेऊन समस्या मांडले.
तालुक्यातील पूरपीडित नागरिकांची अडचण लक्षात घेऊन अजयभाऊ कंकडालवार यांनी अहेरी येथील तहसीलदार तथा तालुका दांडाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाई बद्दल विचारले असता, यावर तहसीलदारांनी 50 टक्के पूरग्रस्तांना मदत निधी देण्यात आले असून उर्वरित 50 टक्के पूरग्रस्तांना लवकरच मदत देणार असल्याचे सांगितले.
यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी तालुक्यातील आल्लापल्ली,व्यंकटरावपेठा,बोरी,माहागाव,वांगेपल्ली,चिंचगुंडी, देवलमरी,आवलमरी,मोद्दूमाडगू, नागेपल्लीसह इतर पूरपीडित नुकसानग्रस्त नागरिकांना जर नुकसान भरपाई तात्काळ मिळवून न दिल्यास पूरग्रस्तांना सोबत घेऊन अहेरी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असे इशारा त्यांनी दिली.
या भेटीत कंकडालवार यांचेसमवेत माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी सदस्य सुनीता कुसनाके,माजी सभापती सुरेखा आलम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पूरपीडित नागरिक उपस्थित होते.