अहेरी तालुकासामाजिक

राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेण्याऱ्या गरजूवंत धावपटूला अजयभाऊ कंकडालवार कडून आर्थिक मदत ..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

एटापल्ली : तालुक्यातील युवा खेडाळू तेजस संगीधवार यांनी जिल्हा मुख्यालयात एमआयडीसी मैदानावर आयोजित दौड स्पर्धेत 100 व 200 मीटर स्पर्धेत दोन्ही स्पर्धांमध्ये पहिला व दुसरा नंबर पटकावल्याने त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत निवड करण्यात आली आहे.

३७ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर १८ आणि २० वर्षा खालील एथलेटिक्स चॅम्पियशिप २०२३ ही राज्यस्तरीय स्पर्धा नाशिक येथे संपन्न होत असून या स्पर्धेसाठी तेजस यांची निवड करण्यात आली आहे.परंतु धावपटू तेजस यांची घरची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांना नाशिक येथे जाऊन राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेणे अडचणीचे ठरत होते.युवा खेडाळू तेजस यांनी आज माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी येथील निवास्थानी भेट घेऊन त्यांना नाशिक येथे जाण्यास आर्थिक अडचण भासत असल्याची त्यांची परिस्थिती सांगून घेतले.

यावेळी कंकडालवार यांनी तेजस ला पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत दिली.

युवा खेळाडू तेजस ला आर्थिक मदत करतांना कंकडालवार यांचे सोबत माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,राकेश अल्लूरवार,राकेश सडमेक,प्रमोद गोडसेलवार,प्रकाश दुर्गेसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close