गुंडेरा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांची काँग्रेस पक्षात प्रवेश …!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …प्रतिनिधी…
अहेरी : तालुक्यातील वेडमपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गुंडेरा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) विद्यमान आमदार व महाराट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे खंदे समर्थक व गेल्या 25 वर्षांपासून राट्रावादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ पदाधिकारी मल्लाजी आत्राम यांनी पक्षातील गटबाजीला कंटाळून त्यांनी आपल्या समर्थकांसह पक्षाला राम राम करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केले.
काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गुंडेरा येथील रा.कॉ. कार्यकर्त्यानी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केले.सदर पक्षप्रवेश सोहळा कंकडालवार यांच्या अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात पार पडला असून पक्ष प्रवेश केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्तांच्या शाल व श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
पक्षप्रवेश कार्यक्रमाला माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,जयराम आत्राम,भीमराव आलाम,सीताराम कोडापे,नंदाबाई टेकाम,लता आलाम,सपना आलाम,लक्ष्मी आलाम,चंद्रकला टेकामसह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.