दक्षिण भागातल्या आगामी निवडणुकांमध्ये अजयभाऊ कंकडालवार नावाचं शिक्का ..विजयी उमेदवारांसाठी शिक्कामोर्तब ठरणार का ..?
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी ग्रामपंचायत सदस्य ते पंचायत समिती पासून राजकीय प्रवासाला सुरुवात करीत जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर कृषी सभापती नंतर जि.प. उपाध्यक्ष व तद्नंतर अध्यक्ष पदाचा हा प्रवास चालू ठेवत जिल्हा परिषदेच्या राजकारणात व सत्ताकारणात आपल्या शैलीने त्यांनी स्वतःचे वर्चस्व निर्माण केले.त्यांनी अख्य जिल्ह्यातच राजकारणातील अजातशत्रू असे व्यक्तिमत्व म्हणून नावलौकिक मिळविला.पक्ष कोणताही असो सर्वपक्षीय जिल्हापरिषद सदस्यांसाठी काम करणारा हक्काचा माणूस त्यांनी आपल्या स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
आपल्या समस्या,विविध प्रश्न घेऊन आलेल्या लोकांचे समाधान करणं, त्यांना पाहिजे ती मदत मिळवून देण हे कार्य ते सातत्याने करत आहे. केवळ निवडणूका डोळ्यासमोर आहे म्हणून लोकांच्या मदतीला न धावता सतत लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तत्परतेने काम करण्याच्या वृत्तीने जनसामान्याच्या मनात एक वेगळेच स्थान त्यांनी निर्माण केले आहे.अपघातात जखमी झालेल्यांना मदत असो की, की एखाद्या आजाराने ग्रस्त रुग्णांना मदत असो, ते अगदी वेळेवर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मदत पोहोचवितात आणि याच कार्यशैली मुळे त्यांच्या राजकीय जीवनाची यशस्वी आगेकूच सुरू आहे असे म्हणावयास हरकत नाही.आजच्या काळात कार्यकर्त्यांना सांभाळणं ही एक मोठी कला आहे.कार्यकर्त्यांच्या सुख दुःखात ज्याप्रकारे धावून जातात आणि दुर्गम व अतिदुर्गम भागात सतत जनसंपर्क ठेवून कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना आधार देणाऱ्या या युवा नेतृत्वाने आधारवड अशी स्वतःची प्रतिमा निर्माण केली.
दक्षिण गडचिरोलीत तरी यापूर्वी असा राजकीय नेत्यांच्या बाबतीत जनतेशी कायम कनेक्टिव्हिटी असणारे राजकीय नेतृत्वाचा अनुभव येथील जनतेने कधी घेतला नव्हता.परंतु कंकडालवार यांनी ते साध्य करत अतिदुर्गम,नक्षलग्रस्त भागात बिनधास्तपणे जाऊन लोकांच्या अडीअडचणी सोडविल्या आणि हे कार्य ते सातत्याने करून जनाधार भक्कमपणे आपल्या पाठीशी कसा राहील या दिशेने त्यांचा राजकीय प्रवास सुरु आहे.दक्षिण गडचिरोलीतील प्रस्थापित राजकीय घराणे असलेल्या आत्राम घराण्याशी त्यांची राजकीय स्पर्धा आहे.आजच्या घडीला दक्षिण गडचिरोलीत या प्रस्थापित राजकीय घराण्यासमोर त्यांनी सत्तास्पर्धेत समांतर आव्हान निर्माण केले आहे.त्यामुळे साहजिकच येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष अजय कंकडलवार यांच्या निर्णयाकडे लागून आहे…आविसच्या माध्यमातून कंकडालवार नेमके किती आपले पाठीराखे सदस्य निवडून आणू शकतात यावर सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण या नावाला वजा करून गडचिरोली जिल्हापरिषदेचे सत्ताकारण पूर्णत्वास जाऊच शकत नाही ,अशी राजकीय परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यात आजच्या घडीला निर्माण झाली आहे.
अनेक प्रस्थापिताशी त्यांची राजकीय स्पर्धा आहे. ते सक्रिय पदाधिकारी म्हणून कार्य करीत असलेल्या आविस या संघटनेची थेट लढाई येणाऱ्या जिल्हापरिषद निवडणुकीत आजी -माजी मंत्र्यांच्या पक्षाशी राहणार आहे.तसेच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांच्या कोणत्या उमेदवाराला समर्थन राहणार आहे ? हे अति महत्वपूर्ण असून त्यांच्या नावाचं शिक्काचं विजयी उमेदवारांसाठी शिक्कामोर्तब ठरणार आहे.दक्षिण गडचिरोलीत त्यांनी खेडे पाडे पिंजून काढत या क्षेत्राचे आजी -माजी मंत्र्यांना दमछाक करीत आहे.एकला चलो चे नारा देत अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत त्यांनी आपली वर्चस्व कायम ठेवतं आघाड्यांना आऊट करून दाखविले.म्हणूनच त्यांनी कंबर कसून दक्षिण गडचिरोलीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आपल्या कामाला सुरुवात केली आहे.
प्रस्थापित राजकीय पक्षात न जाता आविस या स्थानिक संघटनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या व जिल्हा परिषदेत सत्ता स्थान प्राप्त करायचे व त्याच्या आधारे राजकारणात एक भक्कम स्थान निर्माण करायचे असा त्यांचा सत्तेपर्यंत घेऊन जाणारा यशस्वी राजकीय फॉर्म्युला…राजकारणाला प्रभावित करणाऱ्या अशा नेत्यांकडून राजकारणात प्रवेश करणाऱ्यांनी बरेच काही शिकण्यासारखे आहे.