अहेरी तालुकाधार्मिक कार्य

आल्लापल्ली येथील अय्यप्पा स्वामी मंदिर कमिटीचे पदाधिकाऱ्यांनी घेतली जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची भेट..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी : आल्लापल्ली येथील अय्यापा स्वामी कमिटीचे पदाधिकारी – सदस्यांनी आज आविसं व काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन भेट घेतले.

या भेटीदरम्यान अय्यपा स्वामी कमिटीचे पदाधिकारी व सदस्यांनी आपल्या अडचणी अवगत करून दिल्या.यावर माजी जिल्हा परिषद अध्यक्षांनी मंदिरात होणाऱ्या विधिवत पूजा कार्यक्रमाला आर्थिक मदत केली.व त्यांना आश्वासन दिले की मंदिरात पुढील होणाऱ्या कार्यक्रमा करिता आर्थिक अडचण पडल्यास मी सदैव मदत करायला तयार आहे.यावेळी मंदिर कमिटीचे पदाधिकाऱ्यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना मंदिरात दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण दिले.

यावेळी जनसंपर्क कार्यालयात माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,राकेश सडमेकसह आविसं – काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मंदिर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close