गडचिरोली जिल्हासामाजिक

मलमपडी येथील युवा शेतकरी स्व.अजय टोप्पो कुटुंबियांची माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून सांत्वन व आर्थिक मदत !

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क …एटापल्ली…

एटापल्ली….तालुक्यातील मलमपडी येथील युवा शेतकरी अजय दिलराम टोप्पो यांनी आठवडापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यामुळे मृतकाचे आई वडील,पत्नी दोन मुले असा मोठा परिवार उघड्यावर पडला. आज आविस नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी आपल्या कार्यकर्त्यां समवेत एटापल्ली तालुक्यातील मलमपडी या गावाला जाऊन आत्महत्या केलेल्या युवा शेतकरी अजय टोप्पो यांचा घरी भेट देऊन कुटुंबियांची सांत्वन करून आर्थिक मदत दिली. माजी आमदार यांच्याकडून आर्थिक मदत मृतकाचे पत्नी उर्मिला टोप्पो,,मुलगा रोशन टोप्पो,आई पंणमिक्षी टोप्पो,भाऊ जगतपाल टोप्पो यांनी स्वीकारली. यावेळी माजी आमदार आत्राम यांचे सोबत माजी जि.प.सदस्य व आविस युवा नेते संजुभाऊ चरडुके,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, माजी पं. स.सदस्य रमेश तोरे, माजी सरपंच विजय कुसनाके,संदीप बडगे, ग्रा.प.सदस्य अजय मडावी, दिलीप आलम, अशोक बडा, अजित बखळा, श्यामराव कुमरे,आनंद बखळा आदी उपस्तीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close