अहेरी तालुकासामाजिक

रानडुकराच्या हल्ल्यात दुसरी महिलाही गंभीर जखमी..!अजयभाऊ कंकडालवार यांनी दिली आर्थिक मदतीची हात…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…. प्रतिनिधी….

अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या किस्टापुर येथील अनसूर्या सतीश भोयर किस्टापुर रहिवासी असून त्यांच्या पतीचे निधन झाल्याने त्यांना एक मुलगी व एक मुलगा असून पोटाची खळगी भरण्यासाठी व्येंकटरावपेठा कटरापेटा येथे तेंदूपत्ता हंगाम सुरू झाल्याने स्वतःची माहेर असल्याने तेंदूपत्ता तोडाईसाठी व्येंकटरावपेठा येथे आली होती.

आज सकाळी तेंदूपत्ता तोडाईसाठी गेले असता तिच्यावर रानडुक्कराने हल्ला केल्याने या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे.तिला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.तिच्यावर उपचार सुरू आहे.या घटनेची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे अहेरी विधानसभा समन्वयक अजयभाऊ कंकडालवार यांना दिली असता त्यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात जाऊन डॉक्टरांची भेट घेऊन जखमी महिलेची तब्यातीची विचारपूस केले.

त्यानंतर त्यांनी जखमी महिलेची भेट घेऊन तब्यातीची आस्थेने विचारपुस करून घटनेची पूर्ण माहिती घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदत दिली.यावेळी डॉक्टरांनी सदर महिलेवर रानडुकराने हल्ला केल्याने यात महिला गंभीर असून पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविणे आवश्यक असल्याचे म्हंटले आहे.काल सुद्धा एका माहिलेवर तेंदूपत्ता तोडाईसाठी गेले असता रानडुकराने हल्ला चढविला होता.रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेली आजची ही दुसरी घटना असून यातही एक गंभीर झालेली आहेत. तेंदूपत्ता तोडाईसाठी जाणाऱ्या महिलांवरील रानडुकराच्या हल्ल्यांकडे वनविभागाने जातीने लक्ष देऊन महिलांना वनविभागाकडून योग्य आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.

उपजिल्हा रुग्णालयात भेटी व आर्थिक मदत करतांना स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,विनोद रामटेके,मरपल्ली ग्रामपंचायचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,हरिभाऊ,माजी उपसरपंच राऊत,नरेश गर्गम,प्रमोद गोडसेलवार आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close