सिरोंचा येथील धर्मराव विद्यालयात शालेय विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप कार्यक्रम संपन्न….!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …प्रतिनिधी ….
सिरोंचा येथील धर्मराव विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात शालेय विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप कार्यक्रम नुकताच मान्यवरांच्या संपन्न झाला.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शाळेत यें-जा करण्यासाठी खूप मोठा त्रास होत होता.यावर उपाय म्हणून शाळेचे मुख्याध्यापक गणेश तगरे ग्रामीण भागातील शालेय विध्यार्थीनाना सायकल मिळावे म्हणून त्यांनी मानव विकास विभागाकडे रीतसर पाठपुरावा केले होते.या समस्याची दखल घेत मानव विकास विभागाने एकुण 53 सायकली शाळेला मिळवून दिले होते.
नुकताच या शाळेत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील सावित्रीच्या लेखीनां 53 सायकलींचे वाटप मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आला.
या सायकल वाटप कार्यक्रमाला मुख्याध्यापक गणेश तगरे तर प्रमुख पाहुणे म्हणून नीलकंठम तथा केंद्र प्रमुख रच्चावार प्रतिष्ठित नागरिक सत्यनारायण मंचालवार,शंकर बुद्धावार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश रादांडी व सर्व शिक्षक व विद्यार्थी व विद्यार्थिनी व पालक वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.