अहेरी तालुकासामाजिक
अहेरी येथील एम्प्लॉईज फॉर पीपल्स अँड स्टूडेंट संघटनेकडून छल्लेवाडा येथे विविध स्पर्धांचे आयोजन…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी : एम्प्लॉईज फॉर पीपल्स अँड स्टूडेंट अहेरी च्या वतीने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा छल्लेवाडा येथे सामान्य ज्ञान स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विविध सूप्त गुण दडलेले आहेत या सुप्त गुणांना बाहेर काढण्यासाठी संघटनेकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित चित्रकला, वक्तृत्व व सामान्य ज्ञान स्पर्धेत एकूण 188 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेच्या यशस्वी साठी संघटनेचे प्रमुख प्राध्यापक किशोर बुरबुरे, मुख्याध्यापक सुनील आईचवार, शिक्षक सुरजलाल एलमुले, शिक्षक जुमडे, आत्राम यांनी परिश्रम घेतले.