जि.प.माजी अजयभाऊ कंकडालवार यांनी पेरमिली येथील पठाण कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी : अहेरी तालुका पत्रकार संघटना अहेरीचे उपाध्यक्ष व पेरमिलीचे पत्रकार आशिफ खान पठाण यांचे धाकटे बंधू आरिफ खान पठाण यांच्या चार महिन्या पूर्वी बल्लारशाह येथील वनविभागात वनरक्षक म्हणुन नियुक्ती झाली होते.परंतु काही दिवसांपूर्वी आरिफ खान यांचा हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाली. या दुःखद घटनेची माहिती काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांना मिळताच त्यांनी पेरमिली येथे जाऊन पठाण कुटुंबियांचे भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी अहेरी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष पप्पू हकीम,माजी सरपंच प्रमोद आत्राम,कवीश्वर चंदनखेडे,रघुनाथ आउकार,प्रमोद गोडसेलवार,सचिन पंचार्यसह आदी उपस्थित होते