अहेरी तालुका

देवलमरी येथील मंचर्ला कुटुंबियांचे तिन्ही घरे आगीने जळून खाक…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी : मुख्यालया पासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या देवलमरी येथील शेखर मुत्तय्या मंचर्ला,संतोष मुत्तय्या मंचर्ला,मुत्तय्या मंचर्ला या तिघाचे घरे व घरातील संपूर्ण सामुग्री कपडे,खाण्यापिण्याचे सामान तसेच घरातील महागडे वस्तू अचानक पने आग लागल्याने जळून खाक झाले आहे.यात तिन्ही कुटुंबियांचे लाखो रुपयाचे वस्तू जाळून खाक झाली आहे.3 मार्चला रात्रीला घरांना अचानक आग लागल्याने गावातील नागरीक धाव घेऊन आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले.

या घटनेची माहिती परिसरातील आविसं – काँग्रेसचे कार्यकर्त्यां कडून आविसं – काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना देताच त्यांनी नगरपंचायत अहेरी येथील अधिकाऱ्यांना दूरध्वनी द्वारे घटनेची माहिती देऊन घटनास्थळी तात्काळ अग्निशमन वाहन पाठवून दिले.

माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी घटनास्थळी धाव घेऊन या घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतले .दूरध्वनी वरून घटनेचे माहिती उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांना सांगून लवकरात लवकर पंचनामे करून तिन्ही आगग्रस्त मंचर्ला कुटुंबियांना शासना कडून आर्थिक मदत करण्यात यावी म्हणून सांगितले.यावेळी तीनही कुटुंबियांना घरचा नित्यावश्यक वस्तूसाठी अजयभाऊ कंकडालवार यांनी आर्थिक मदत केली.

यावेळी उपस्थित अजय नैताम माजी जि.प.सदस्य,वैभव कंकडालवार ग्रा.प.उपसरपंच इंदाराम,ग्रा.प.सदस्य महेश लेकुर, ग्रा.प.विध्या राऊत,ग्रा.प.सदस्य संजूबाई आत्राम,संजय गोडेवार, वैकटेश पानेम,सतीश बिचाला,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,नरेश गर्गम,प्रमोद गोडसेलवरसह आविसं – काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील नागरिक होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close