हजारो वऱ्हाडांच्या साक्षीने कोडसेलगुडम येथे 65 जोडपे अडकले विवाहबंधनात…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….
गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी तालुक्यांतील कोडसेलगुडम येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व अजयभाऊ मित्र मंडळाकडून काल कोडसेलगुडम येते 65 जोडप्यांच्या विवाहबंधन एकाच मांडवात सामूहिकरित्या हजारो वऱ्हाडांच्या साक्षीने व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
विवाह बंधनात अडकलेल्या 65 जोडप्यांच्या नवदाम्पत्यासाठी मंगळसूत्र,डोरले,वधू-वरांना नवे कपड़े,संसारोपयोगी साहित्य व वऱ्हाडीना मिष्टान्न भोजनासह या सोहळ्याचे संपूर्ण खर्च आविसं काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजयभाऊ कंकडालवार यांनी उचलत सामाजिक भावनेतून कंकडालवार परिवाराने या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले.
लग्न सोहळ्याला येणारा संपूर्ण खर्च प्रशासनाकडुन नव्हता तर कंकडालवार परिवाराकडुन करण्यात आला होता. हे विशेष.तसेच या लग्नसोहळ्यात पंचहत्त्तर टक्के अनु.जमातीचे जोडपे होते तर उर्वरित अनु.जाती,व इतर प्रवर्गतील जोडपे लग्न बंधनात अडकले आहेत.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे नेते डॉ.नामदेवरावजी उसेंडी माजी आमदार,सहउदघाटक हनुमंतूजी मडावी,सेवानिवृत्ती सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष,प्रमुख पाहुणे हसन आली गिलाणी साहेब,कांग्रेस माजी जिल्हा अध्यक्ष, सोनालीताई कंकडालवार माजी उपसभापती पं.स.अहेरी,सुरेखाताई मडावी महिल सामजिक कार्यकर्ते,अजय नैताम माजी जिल्हा परिषद सदस्य,भास्कर तलांडे माजी सभापती पं.स.अहेरी,सूनिताताई कुसनाके माजी जि.प.सदस्य,सुरेखाताई आलाम माजी सभापती पं.स.अहेरी,डॉ.निसार हकीम कांग्रेस अहेरी तालुका अध्यक्ष, बल्लू सडमेक अध्यक्ष एस टी सेल,प्रज्वल नागुलवार तालुका अध्यक्ष एटापली,नामदेव आत्राम,हनिफ शेख अध्यक्ष अल्पसंख्य,गणेश पउपलवार महासचिव,सुरेश दुर्गे,गजानन झाडे,रामप्रसाद मुंजमकर,राजक भाई पठाण,श्रीनिवास पेंदाम सरपंच ग्रामपंचायत कमलापुर,सचिन ओल्लेटीवार उपसरपंच,अशोक येलमुले माजी उपसरपंच किष्टापुर,गुलाबराव सोयाम माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य,हरिष गावडे उपसरपंच देवलमारी,राजु दुर्गे ग्रामपंचायत सदस्य,कालिदास कुसनाके ग्रामपंचायत सदस्य,गंगाराम मडावी सामजिक कार्यकर्ते,वर्षाताई पेंदाम सरपंच इंदाराम,लक्ष्मण कोडापे ग्रामपंचायत सदस्य रेपणपल्ली,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक,सुरेखा गोडसेलवार नगरसेविका,मीनाताई ओंडरे नगरसेविका,शारदा कोरेत ग्रामपंचायत सदस्य,वंदना दुर्गे ग्रामपंचायत सदस्य महागाव,इंदुताई पेंदाम,कलावती कोड्रावार ग्रामपंचायत सदस्य,प्रणाली मडावी ग्रामपंचायत सदस्य रेपणपल्ली,स्वप्नील मडावी,कार्तिक तोगाम,नरेश गर्गम, प्रमोद गोडसेलवार,सचिन पांचार्य लक्ष्मण आत्राम,चिंटू पेंदामसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक – नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते