जि.प.माजी अध्यक्ष व काँग्रेस नेते कंकडालवार यांनी जाणून घेतल्या कोंदावाही येथील ग्रामस्थांची समस्या…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क ….
एटापल्ली : तालुक्यातील कोंदावाही येथे आविसं काँग्रेसनेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी दौरा करून गावातील ग्रामस्थांची विविध समस्या जाणून घेतले.
यावेळी गावातील नागरिकांनी गांवात निर्माण झालेल्या पाण्याची समस्या,गली रस्ते,नाली,लाईन इलेक्ट्रिक,वण जमीनपट्टेसह आदि प्रमुख समस्या असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.तसेच येतील नागरिकांनी एकत्रित बैठक घेवुन अनेक विषयांवर चर्चा करून या चर्चेदरम्यान विविध समस्या त्यांच्यासमोर मांडण्यात आले असता या सर्व समस्यांची निराकरण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू,असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिली. येथील वीज जनित्र मागील वीस दिवसांपासून बंद पडल्याने गावात विजेची समस्या निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी त्यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून नवीन जनित्र तात्काळ लावण्याचे सूचना केले. तसेच यावेळी ग्रामस्थांसोबत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीबाबत सुद्धा चर्चा करण्यात आली.
यावेळी चर्चा दरम्यान महेश बिरमवर,बंडू तलांडे,महरू तलांडे,गाव भूमिय,सुधाकर टिम्मा,निलेश वेलादी सरपंच मेडपल्ली,कवडूजी चल्लावर,प्रज्वल नागुलवार सचिव तालुका एटापल्ली काँग्रेस नेते,जयांद्र पवार सभापती आ.वी का.जरावांडी,सुधाकर टेकाम उपसरपंच जरावंडी,सुधाकर गोटा वेन्हारा इलाका अध्यक्ष एटापल्ली,मरपल्ली माजी उपसरपंच कार्तिक तोगम,शंकर आत्राम,चींना आत्राम,मारू तलांदे,साईनु सिडाम,रामजी पुंगाती,रामजी कुड्येती,रुपेश मडावी,मधुकर तलंदी,राजू उसेंडी,संजय आत्राम,बाजू तलंडी,सचिन पंचर्या,चिंटू,दिवाकर तलांडीसह स्थानिक आविसं काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.