आल्लापल्ली येथे इंडिया आघाडीचे लोकसभेचे उमेदवार डॉ.किरसान यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन…!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क..
अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील गडचिरोली – चिमूर लोकसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी आलापल्ली येथे इंडिया / महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.नामदेवराव किरसान साहेबांचा प्रचार जनसंपर्क कार्यालय उभारण्यात आली आहेत.सदर प्रचार कार्यालयचे उदघाटन आविसं काँग्रेसनेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते संपन्न झालं आहे.या प्रचार जनसंपर्क कार्यालयाची प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी होते.
यावेळी काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना भविष्यात काँग्रेस पार्टी व आघाडी सत्तेत आल्यास आपल गाव आणि संपूर्ण जिल्हाचे विकास होऊ शकते.म्हणून पदाधिकारी व कार्यकर्त्यानी आपआपल्या गावातील प्रत्येक मतदारांना सांगून आघाडीचे उमेदवाराला मतदान करण्यासाठी प्रचार करण्यात यावी.आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यानी एकत्रित येऊन प्रचार करण्याची सूचना दिले.
यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते कोलपकवार सावकार,काँग्रेस तालुका अध्यक्ष निसार ( पप्पू ) हकीम,सुरेश रायकुडलीया,रफिक भैया,गणेश गुप्ता,अज्जू पठाण,राजू गुप्ता,मुस्ताक हकीम,कार्तिक निमसरकार,महिला तालुका अध्यक्ष सपना नैताम,उषा आत्राम,सुमनताई खोब्रागडे,शिलाताई चालूरकर,पुष्पाताई जगनाप,भाग्यश्री बेझालवार,स्वप्नील मडावी,रज्जाक पठाण,जावेद शेख,सचिन पंचर्य,राजू गोयल,नामदेव आत्राम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,फिरोज शेख,हुसेन शेख,हनिक भैया,बबलू सडमेक,रामप्रसाद मंजुमकर,किशोर सडमेक,बाबुराव मडावी,दौलन उरते,साईनाथ उरते,दिलीप आत्राम,अमोल आत्राम,श्रीकांत आत्राम,सलू आत्राम,संजू आत्राम,तिरुपती आत्राम,प्रभाकर आत्राम,मदन गावडे,मनोज सडमेक,तिरुपती सडमेक सावकार,अज्जू सडमेक,शैलेश कोरेत,शंकर सिडाम,रवी कोरेत,प्रमोद गोडसेलवारसह आविसं काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..