क्रिडा स्पर्धांमधून प्रत्येक खेळाडूंना शारीरिक व भावनिक प्रोत्साहन मिळते.. माजी आमदार दिपक दादा आत्राम

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी….व्हॉलीबॉल हा खेळ आज अनेक लोकांमध्ये लोकप्रिय झाले असून हा खेळ एक आगळा वेगळा खेळ आहे.या खेळातून प्रत्येक खेळाडूंना आनंद द्विगुणित करता येते,या खेळाचे क्षेत्रस्तरीय स्तरावर एक वेगळी ओळख असून स्पर्धात्मक खेळ जिंकण्यासाठी खेळाडूंनी कठोर परिश्रम घेणे आवश्यक असले तरी क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूंना शारीरिक व भावनिक कल्याणाचा प्रोत्साहन मिळत असल्याचे प्रतिपादन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी केले.
ते अहेरी तालुक्यातील मेडपल्ली येथे जय गोंडवाना क्लब कडून आयोजित ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
मेडपल्ली येथे जय गोंडवाना कलबकडून माजी सरपंच तुकाराम वेलादी यांच्या भव्य पटांगणावर आयोजित व्हॉलीबॉल सामन्याचे विधिवत उदघाटन सोहळ्याला सहउदघाटक म्हणून आविसचे युवा नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन सोहळा कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मेडपल्ली सरपंच निलेश वेलादी तर प्रमुख पाहुणे म्हणून येथील पोलीस पाटील कोत्ताजी आत्राम,पत्रकार आसिफ पठाण,करपा कुडमेथे,नामदेव तोर्रेम, सुरेश जाकेवार, रामाजी पल्लो,तिरुपती पेंदाम,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,संदीप बडगे,नगरसेवक प्रशांत गोडशेलवार, दिवाकर तलांडे,अविनाश मेश्राम,अंकुश जाकेवार,महेश वेलादी,रोशन जाकेवार,सूरज मडावी,अक्षय सडमेक,अशोक मेश्राम सह आविसचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उदघाटन सोहळ्याला सहउदघाटक म्हणून लाभलेले माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांनी व्हॉलीबॉल या खेळाविषयी उपस्थित खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. या व्हॉलीबॉल सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून तर द्वितीय पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून आणि तृतीय पुरस्कार येथील तलाठी कु.पूजा मडावी यांच्याकडून ठेवण्यात आले.या सोहळ्याचे संचालन व उपस्थितांचे आभार सूरज मडावी यांनी मानले.तसेच या सामन्यासाठी स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांकडून अनेक आकर्षक व रोख पुरस्कार ठेवण्यात आले. उदघाटन सोहळ्याला आविस पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मेडपल्ली येथील गावकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.