मरपल्ली ते करांचा रस्ता बांधकामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करा….जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची मागणी..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …प्रतिनिधी…
अहेरी :लोकसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता सुरू असताना सुद्धा तालुक्यात काही गावांमध्ये विविध स्वरूपाचे विकासकामे सुरू आहेत.ग्रामीण भागाला तालुका मुख्यालयाशी जोडण्यासाठी रस्ते बांधकामासाठी उदात्त हेतूने सरकार जरी आवश्यक निधी उपलब्ध करून देत असले तरी या निधीचे ग्रामीण भागात योग्यप्रकारे उपयोग होतांना मात्र दिसून नाही येत आहे.यात मरपल्ली ते करंचा या मार्गाचे रस्त्याचे बांधकाम हे आघाडीवर असून उत्तम उदाहरणही ठरत आहे.या रस्त्याचे कामासाठी संबंधित कंत्राटदाराने चक्क नाल्यातली मोठं मोठी दगडाचे वापर करीत कामाला सुरुवात केल्याचे उघड झाल्याने या रस्त्याच्या कामावर व दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
कोणत्याही प्रकारची रायल्टी न घेता नाल्यावरील व जंगलातील गोल स्वरूपाचे मोठमोठे गोटे आणून रस्त्यावर टाकत खालच्या दर्जाचे व अत्यंत निकृष्ट स्वरूपाचं काम संबंधित कंत्रादारांकडून सुरू असल्याचं आरोप होत आहे.मरपल्ली ते करांचा या मार्गासाठी अंदाजे 2 किलो मिटर पर्यंत रस्ताचे बांधकाम मंजूर आहे.रितसर या कामाचे ई निविदा प्रणालीद्वारे टेंडर काढणे आवश्यक असतांना या कामाचे ई-निविदा प्रक्रिया पार न पाडताच 100 – 100 मीटरचे तुकडे पाडून कामाला सुरुवात केल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार हे या भागात दौऱ्यावर असतांना त्यांनी वरील रस्त्याची बांधकामाची स्वतः पाहणी केली. त्यांच्या या पाहणीत सदर रस्त्याचे बांधकाम हे अत्यंत खालच्या व निकृष्ट दर्जाचे व तसेच नाल्यातील दगडाने काम सुरू असल्याचे दिसून आल्याने त्यांनी मरपल्ली ते करांचा या रस्ता बांधकामाची योग्य चौकशी करून संबंधित विभागाचे अभियंता व कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मरपल्ली ते करांचा या रस्ता बांधकामाची चौकशीला तात्काळ संबंधित विभागाकडून सुरुवात न झाल्यास व यात आढळणाऱ्या दोषीविरुद्ध उचित कारवाई न केल्यास आपण स्वतः व या दोन्ही गावांमधील गावकऱ्यांना सोबत घेऊन आल्लापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याची इशारा सुद्धा कांकडालवार यांनी दिली आहे.