टिकेपल्ली येथील नलगोंडा पोचम्मा देवी बोनालु कार्यक्रमाला अजयभाऊ कंकडालवार दाम्पत्याची उपस्थिती…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क ….प्रतिनिधी….
मुलचेरा : तालुक्यातील टिकेपल्ली येथे नलागोंडा पोचम्मा देवीच्या बोनालू पूजा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा टिकेपल्ली येथे नलागोंडा पोचम्मा देवी बोनालू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.या देवीच्या बोनालू कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा क्षेत्र निरीक्षक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी सपत्नीक उपस्थिती दर्शवून देवीची दर्शन घेतले.यावेळी त्यांनी देवीच्या चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केली. या पूजा कार्यक्रमाला गावकरी व भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कंकडालवार दाम्पत्य पोचम्मा देवीची दर्शनावेळी त्यांचे समवेत माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी जि.प.सदस्य सुनीता कुसनाके,महागाव ग्रामपंचायत सदस्य राजू दुर्गे,नरेंद्र गर्गम,दिनेश मडावी,अजय नैताम,प्रमोद गोडशेलवारसह आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.