अहेरी तालुकाधार्मिक कार्य

श्रीगणेश व नागदेवता मूर्तींची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला काँग्रेसचे युवा नेते अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क… प्रतिनिधी…

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील वी.दा.सावरकर चौक हनुमान मंदिरात हनुमान जन्मोउत्सव निमित्त नागदेवता तसेच श्री  गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या आयोजित कार्यक्रमाला आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्र समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी  उपस्थितीती दर्शवून दर्शन घेतले.

त्यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी भगवान हनुमान,नागदेवता तसेच श्रीगणेश मूर्तीचे विधिवत पूजा अर्चना करून दर्शन घेतले.दरम्यान अजयभाऊंनी समस्त जनतेला हनुमान जन्मोत्सव निमित्त शुभेच्छा दिल्या.

त्यावेळी काँग्रेसनेते कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त जनतेला सुख शांती समृद्धी लाभोयासाठी बजरंगबली हनुमान,नागदेवता,गणपती बाप्पाकडे प्रार्थना केली.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,टायगर ग्रुपचे पदाधिकारी साई तूलसीगीरी,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,बबलू शेख,रवी मुपीडवार,विनोद रामटेकेसह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने आलापल्ली नगरवासी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close