सामाजिकसिरोंचा तालुका

गर्कापेठा येथे साकारणार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

सिरोंचा..तालुक्यातील सिरोंचा व आल्लापल्ली या मुख्य मार्गावर असलेल्या गर्कापेठा येथील मुख्य चौकात आविसं पदाधिकारी व बाबासाहेबांच्या अनुयायी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या लोकवर्गणीतून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य असं पुतळा लवकरच उभारण्यात येणार आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा बसविण्याचे नियोजित जागेचे भूमिपूजन नुकताच गर्कापेठा येथे भारत राष्ट्र समितीचे नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उरकला.ते सिरोंचा तालुका दौऱ्यावर आले असता त्यांच्या शुभहस्ते या भूमिपूजनाचे काम बाबासाहेबांचे अनुयायांनी करवून घेतले. गेल्या अनेक वर्षांपासून या मुख्य चौकात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा बसवावा,अशी मागणी या गावासह परिसरातील आंबेडकरी अनुयायांकडून केली जात होती.नुकताच या कामाचे माजी आमदार आत्राम यांच्या हस्ते श्रीगणेशा झाल्याने आंबेडकरी अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. पुतळा उभारण्याचे नियोजित जागेची भूमीपूजनानंतर माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी पुतळा उभारण्यासाठी आपल्या परीने आवश्यक मदत करू,असे आश्वासन आंबेडकरी अनुयायांना दिली. तालुक्यातील गर्कापेठा गावासह परिसरातील अनेक गावांमध्ये आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने वास्तव्याने आहेत.हे विशेष..या भूमीपूजना प्रसंगी आविस नेते,अनुयायी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close