सिरोंचा तालुका

टेकडाताल्ला येथील अलसा कुटुंबियांची माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून सांत्वन व आर्थिक मदत

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

◆सिरोंचा◆ तालुक्यातील टेकडाताल्ला येथील आविस कार्यकर्ते महेश अलसा यांच्या पत्नीची मानसिक आजारामुळे दुःखद निधन झाले होते. या दुःखद घटनेची माहिती भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना मिळताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत त्यांच्या घरी भेट देऊन सांत्वन करून त्यांना आर्थिक मदत केले. यावेळी आविस सिरोंचा तालुकाध्यक्ष बानय्या जनगम,जाफ्राबाद सरपंचा निर्मला कुळमेथे,माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके, व्यंकटापूरचे सरपंच अजय आत्राम,गरकापेठाचे सरपंच सूरज गावडे,मादारामचे सरपंच दिवाकर कोरेत,जाफ्राबाद ग्राप सदस्य बिचमय्या कुडमेथे,आविस सिरोंचा शहराध्यक्ष रवी सुलतान,आविस सल्लागार विजय रेपालवार,आविस सल्लागार साई मंदा,जाफ्राबाद ग्राप सदस्य महेंद्र दुर्गम,ग्राप सदस्य शंकर घोडाम, माजी उपसरपंच तिरुपती दुर्गम,आविस सल्लागार वाईल तिरुपती, आविस सल्लागार राजन्ना दुर्गम,व्यंकटापूर माजी उपसरपंच व्यंकटी कारसपल्ली, आलापल्ली ग्राम पंचायतचे माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,आविस सल्लागार दुर्गेश लंबडी,रवी दुर्गम,नागेश जाडी सह आविस व भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close