गडचिरोली जिल्हासामाजिक

देवलमरी येथील महाराष्ट्र बँकेची शाखा परत आणण्यासाठी निवेदन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

– जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदनातून मागणी.

📝अहेरी :- तालुक्यातील देवलमरी येथे महाराष्ट्र बँकेची शाखा परत आणण्याकरीता जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.देवलमरी येथे १९८९ सलापासून महाराष्ट्र बँकेची शाखा सुरू होती. परंतु सध्या स्थितीत येथे बँक कार्यरत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना व इतर सर्व नागरिकांना, श्रावण बाळ योजनेचा लाभ घेणाऱ्या वृद्ध लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शाखेत ग्रामपंचायत देवलगरी, इंदाराम, वट्रा, आवलमरी व तिमरम यांचे विविध शासकीय योजनेचे खाते होते. तसेच ग्रामपंचायत अंतर्गत महिला बचत गटाचे खाते सुरू होते व या शाखेत श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना व इतर शासकीय योजना रमाई घरकुल, शबरी घरकुल, आदिम जमातीचे घरकुल, इंदिरा आवास घरकुल लाभार्थीचे खाते या बँकेत होते. शेतकरी वर्ग या शाखेतून पीक कर्ज घेत होते व गावकरी लोकांचे खाते होते. देवलमरी येथे बँक असल्यामुळे पाचही ग्रामपंचायतीचे नागरीक व महिला बचत गट या शाखेतुन आर्थिक देवाण-घेवाण करत होते परंतु सदया स्थितीत महाराष्ट्र बँकेची शाखा अहेरी येथे स्थलांतर करण्यात आल्यामुळे नागरिकाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काहीवेळेस अहेरीला प्रवास करायला परिवहन मंडळाचे बस सेवा उपलब्ध नसल्याने सुद्धा प्रवासाचा त्रास भोगावा लागत आहे. हा त्रास कमी करण्यासाठी देवलमरी येथील महाराष्ट्र बँकेची शाखा परत सुरू करण्यास मदत करावी अशी मागणी नागरिकांनी जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे केली आहे..!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close