अहेरी तालुकासामाजिक

दुचाकी अपघातातील गंभीर रुग्णांची काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून विचारपूस व आर्थिक मदत…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी : तालुक्यातील मेडपल्ली येथील विश्वनाथ मेश्राम , सुरेंद्र मडावी ,दिनेश मडावी या तीन युवकांनी आज अहेरी मुख्यालयाला  काही कामानिमित्त आले होते.काम आठोपुन परत स्वगावी जात असतांना मेडपल्ली जंगल परिसरात दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी खाली कोसडून अपघात घडल्याने या अपघातात तीन युवक गंभीर जखमी झाले.त्यात एक युवकाच्या डोक्याला व तोंडाला जबर मार लागल्याने त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले.

याअपघाता बाबत स्थानिक कार्यकर्त्यांकडून काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख व जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेत रुग्णांची प्रकृतीची आस्थेने विचारपूस करून त्या तीनही युवकांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदत केली.

यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतूजी मडावी,माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी उपसरपंच कार्तिक तोगम, मेडपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच निलेश वेलादी,नरेंद्र गर्गम,स्वप्नील मडावी,अज्जूभाऊ पठाण,चंद्रकांत बेजलवार,रज्जाक पठाण,सचिन पांचार्य,राकेश सडमेक,रागाव गौरकरसह स्थानिक आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close