Gamesगडचिरोली जिल्हा

गडचिरोली उद्यापासून अप्पर डिप्पर प्रीमियर लीग व करंडक क्रिकेट सामन्याचे आयोजन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
गडचिरोली.
अप्पर डिप्पर व्हाट्सअप ग्रुपच्या वतीने दरवर्षी अप्पर डिप्पर प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्या जाते.
यावर्षी स्पर्धेचा उद्घाटन 14 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता गडचिरोली येथील चांदाळा रोडवरील गोटुल भूमि मैदानात होणार आहे. या स्पर्धेचा थरार 25 जानेवारीपर्यंत रंगणार आहे.
अप्पर डिप्पर प्रिमियर लीग स्पर्धेत फ्रेन्चायझी सिस्टम असून यामध्ये 4 संघाचा समावेश आहे. तर करंडक स्पर्धेत ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा असल्यामुळे इतरही संघानाही प्रवेश करता येणार आहे. करंडक स्पर्धेत प्रथम पारितोषिक लॉयड्स मेटल अॅन्ड एनर्जी लिमिटेड कडून 51 हजार रुपये, द्वितिय बक्षिस धन्वंतरी हॉस्पीटल आणि अमित संगीडवार यांच्याकडून 41 हजार रुपये तर तृतीय बक्षिस जय हिंद फॅशन वर्ल्ड गडचिरोली कडून 21 हजार रुपये देण्यात येणार आहे.
क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्याहस्ते होणार असून अध्यक्षस्थानी धन्वंतरी हॉस्पीटलचे डॉ.अनंता कुंभारे राहतील. प्रमुख अतिथि म्हणून मोटार वाहन निरीक्षक सचिन जमखंडीकर, मोटार वाहन निरीक्षक चेतन पाटील, सिटी हॉस्पीटलचे डा.यशवंत दुर्गे, प्रेस क्लबचे अध्यक्ष नंदकिशोर काथवटे, मार्कंडेय हॉस्पीटलचे डा.प्रशांत चलाख, नोबेल हॉस्पीटलचे डा.बाळू सहारे, दैनिक पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी अविनाश भांडेकर, उपमुख्याधिकारी रविंद्र भंडारवार उपस्थित राहणार आहेत. तर समारोपीय कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार डा.देवराव होळी राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे तर प्रमुख अतिथि म्हणून माजी नगरसेवक प्रमोद पिपरे आदि उपस्थित राहणार आहेत. अप्पर डिप्पर प्रिमियर लीग स्पर्धेत चार संघाचा लिलाव झाला असून या चारही संघाची नावे पर्यटन स्थळांच्या नावावरुन ठेवण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील पर्यटनास चालना मिळावी या हेतूने यावर्षी अप्पर डिप्पर लीगने संघाना पर्यटन स्थळांची नावे देण्यात आली आहे. मागील वर्षी लीग स्पर्धेतील संघाची नावे जिल्ह्यातील नद्यांच्या नावांवरुन ठेवण्यात आली होती.
अप्पर डिप्पर प्रिमियर लीगमधील चपराळा फॉरेस्ट संघाचे मालक डा.यशवंत दुर्गे, मुतनुर मॅजिक संघाचे मालक बलराम सोमनानी, गुरवळा सफारी संघाचे मालक अनुराग पिपरे तर भंडारेश्वर फोर्ट संघाचे मालक निखिल मंडलवार आहेत. प्रिमियर लीग ही स्पर्धा चार संघात होणार असून यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या खेळाडून करीता आकर्षित बक्षिस ठेवण्यात आली आहेत क्रिकेट संघांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन अप्पर डिप्पर प्रिमियर करंडक स्पर्धेच्या आयोजकांनी केले आहे. करंडक स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर मॅन ऑफ दी मॅच ट्रॉफी वितरित केली जाणार आहे.अप्पर डिप्पर प्रिमियर लीगच्या माध्यमातून पत्रकार, कर्मचारी, व्यापारी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या खेळाला चालना मिळणार आहे.तर करंडक स्पर्धेच्या माध्यमातून युवा खेळाडूंना आपला कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे.सदर स्पर्धेत मोठ्या प्रमाणात क्रिकेट संघांनी सहभागी होण्याचे आवाहन अप्पर डिप्पर ग्रुपने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close