अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाला जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार कडून आर्थिक मदत

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क
अस्वलाच्या हल्यात जखमी झालेल्या इसमाला जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत..
अहेरी:- तालुक्यातील येरमनार ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या अतिदुर्गम जंगलव्याप्त कवठाराम गावातील शेतकरी इसम जोगा तलांडी यांच्यावर काल शेतांकडे घेले असता जंगलात ठाम मांडून बसलेला अस्वलाने झडप मारून हल्ला केला होता त्या हल्लयात सदर जोगा तलांडी चे उजव्या हाताचे पाच हि बोटे अस्वलानी मोडून टाकुन , गंभीर जखमी केला. प्रसंग सावधनाने सदर इसमानी दुसऱ्या हातात असलेल्या लाकडी काठ्याच्या सहायाने अस्वलीला कसे बसे हाकलून दिले व आपले प्राण वाचवले आहे.मात्र हाताचे बोटे अस्वलाने तोडल्यामुळे सदर गंभीर जखमी झालेल्या इसमाला अहेरी यथील रुद्रासाई दवाखान्यात दाखल करण्यात आले असुन याबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांना कळताच रुद्रसाई दवाखाना अहेरी येथे गाठून सदर इसमाची तब्यतीची विचारपूस करून आर्थिक मदत केले आहे.यावेळी जि. प. सदस्य अजय नैताम व आविस कार्यकर्ते उपस्थित होते