ईतर
मरपल्ली येथील आलाम कुटुंबियांना जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क
मूलचेरा:- मूलचेरा तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय येला अंतर्गत येत असलेल्या मरपली येतील रहिवासी कालीदास आलाम यांचे दुखद निधन झाले आहे.घरचा प्रमुख् व्यक्ती यांच्या अचानक निधन झाल्याने आर्थिक प्रश्न उद्भभवला असल्याने पुढील कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी कालीदास आलाम यांच्या पत्नी वर्षा कालीदास आलाम हिला सांत्वन करत आर्थिक मदत केली.
यावेळी मधुकर मडावी,सुरेंद्र मडावी,लिंगा टेकूलवार,काशिनाथ मडावी,संजु सिडाम,चीन्ना नैताम,नरेश राऊत,मनीराम राऊत,प्रकाश आलाम,हरीदास आलाम,दिवाकर सिडाम आदि उपस्थित होते.