सिरोंचा तालुका

अबब …महाराष्ट्र -तेलंगणा प्रशासना आईसोबत शेवटी आम्हालाही आंदोलनात उतरविले ना !

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क …सिरोंचा तालुका.

तेलंगणा सरकारच्या महत्वकांक्षी मेडिगड्डा कालेश्वर या सिंचन प्रकल्प विरुद्ध तालुक्यातील बाधितांनी येथील तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात केले असून आज या आंदोलनाची चौथ्या दिवशी एका प्रकल्प बाधित आईसोबत दोघं चिमुकल्यांनीही आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या हाती घोषणा फलके घेऊन तेलंगणा व महाराष्ट्र सरकार विरुद्ध घोषणा देत अबब…महाराष्ट्र -तेलंगणा प्रशासना शेवटी आमचं आईसोबत आम्हालाही न्याय हक्कासाठी आंदोलनात उतरविले ना ? असे बोलक्या आवाजात या आंदोलनात उतरलेल्या चिमुकल्यांनी दोन्ही सरकारविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केले. शाळेत जायचं वयात चिमुकल्यानी सरकारविरुद्ध आपल्या हाती घोषणा फलके घेऊन नारेबाजी केल्याने किमान आता तरी दोन्ही सरकार जागे होऊन प्रकल्पग्रस्तांची मागण्या ऐकून घेणार काय ? आता या चर्चांना उधाण आले आहे. आंदोलनाचे आजचे चौथा दिवस असून आजच्या धरणे आंदोलनाचे नेतृत्व हे प्रकल्पबाधित महिलांनी केले.अन यात दोघ चिमुकल्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून घोषणा दिल्या.

महाराष्ट्र व तेलंगणा सरकार मिळून संयुक्त पद्धतीने भूसंपादन प्रक्रिया थेट पद्धतीने करून बाधित शेतकऱ्यांना प्रति एकर 20 लक्ष रु.आर्थिक मोबदला देण्यात यावी व बाधित गावांना प्रकल्पग्रस्त घोषित करण्यात यावी,प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे मागील तीन वर्षांपासून उभी पिकांची नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्यात यावी आदी अनेक महत्वपूर्ण मागण्याच्या निराकरणासाठी बाधितांनी येथील तहसिल कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केले.

या धरणे आंदोलन मंडपाला आजपर्यंत स्थानिक तहसीलदार व भाजपचे युवा नेते संदीप कोरेत यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची समस्या जाणून घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close