अहेरी तालुकासामाजिक

समाज उन्नतीसाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे …माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क …अहेरी

📝अहेरी तालुक्यातील जिम्मलगट्टा येथे आदिवासी गोटुल समिती कडून बिरसा मूंडा जयंती व वीर बाबूराव शेडमाके यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळा थाटात पार पडला.सर्वप्रथम आदिवासी क्रांतीकारी वीर बाबूराव शेडमाके,बिरसा मूंडा,यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून गोंगो पूजा करण्यात आले.वीर बाबूराव शेडमाके व बिरसा मुंडा यांच्या पालखी घेवून गावात भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी उदघाटक म्हणून बोलतांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार म्हणाले आज आपण वीर बाबूराव शेडमाके यांच्या पूतळ्याच्या अनावरण व बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम आपण साजरी करत आहोत त्यानिमित्तने सर्व समाज घटक एकत्रित आलो असून समाजचे उन्नतीसाठी व समाजाचे सर्वांगीण विकासासाठी एकत्र राहून काम केल्यास निश्चित विकास होईल त्यासाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.तसेच आदिवासी बांधवाना पेसा कायदा,वन हक्क कायदा,आदिवासीचे रुंढी,परंपरा,जल जंगल ज़मीन विषय सखोल अशी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सोमजी वेलादी सामाजिक कार्यकर्ते,शंकर गावडे सर भूमका महासंग सचिव व गोंडी प्रचारक आदि होते.कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून शिवसेनेचे अहेरी जिल्हा प्रमुख रियाज शेख,सुरेखा आलाम माजी सभापती ,कलिक सर मुख्याध्यापक आश्रम शाळा,डॉ.संतोष नैताम कमलापूर आरोग्य अधीकारी,पंकज तलांडे सरपंच जीमलगठा,अजय आत्राम सरपंच बामणी,शांताताई सिडाम सरपंच पेठा, ज्योतीताई मडावी माजी उपसरपंच कोंजेड, सयाम सर,खडू सर,पोटे सर,पेरामा चिंनाजी मिसाल,प्रमोद कोडापे,सलाम भाई,शिवराम भाऊ,व इतर मान्यवर उपस्तीत होते.या कार्यक्रमाचे संचलन सुंदर नैताम यांनी केले.सायंकाळी महाप्रसादाच्या कार्यक्रमानंतर आदिवासी सांस्कॄतिक कार्यक्रम घेण्यात आले असून कार्यक्रमात परिसरातील अनेक संघांनी सहभाग घेतले. या कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य जनता उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close