अहेरी हे क्रिडा क्षेत्रासाठी अत्यंत प्रसिद्ध शहर …माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी.. क्रिकेट हा खेळ या परिसरातील अतिशय आवडता खेळ आहे.तसेच हा खेळ अतिशय रोमांचक आणि प्रसिद्ध खेळ आहे.आज या खेळाला राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर अनन्य महत्व आहे.अहेरी शहरातही पूर्वीपासून क्रिडा स्पर्धांच्या माध्यमातून हाँकी,फुटबॉल,व्हॉलीबॉल व क्रिकेट असे अनेक खेळांचे आयोजन होत असे.यापूर्वी या शहरातील मैदानावर राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक खेळाडूंनी मैदान मारल्याचे अनेक उदाहरणे आहेत.अख्या गडचिरोली जिल्ह्यातच आजही अहेरी शहर हे क्रिडा क्षेत्रासाठी अत्यंत प्रसिद्ध शहर असल्याचे प्रतिपादन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष आणि माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी केले. ते अहेरी येथे आयोजित टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटन प्रसंगी केले.
या
उदघाटनीय समारंभाला अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार तर प्रमुख पाहुणे म्हणून अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा रोजाताई करपेत, नगर पंचायत उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहेरी रवींद्र बाबा आत्राम,शिवसेना अहेरी जिल्हाप्रमुख रियाज भाई शेख,राजेश भाऊ बेजांकिवार,कौसर खा पठाण,कंत्राटदार अजय नागुलवार,संतोष बेजनकीवार,नितीन जंगमवार,बबलू पटवर्धन,नगरसेवक विलास सिडाम,नगरसेविका ज्योतीताई सडमेक,माजी नगरसेविका ममताताई पटवर्धन,राजूभाऊ पडालवार,नगरसेवक महेश बाकेवार,नगरसेवक विलास गलबले,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,वांगेपल्लीचे सरपंच दिलीप मडावी,माजी सरपंच विजय कुसनाके,कोठारी सरपंच रोशनी ताई कुसनाके,वेलगुरू उपसरपंच उमेश मोहुर्ले,ग्रामपंचायत सदस्य उषाताई आत्राम,नितीन भाऊ पटवर्धन,योगेश दंडिकवार,आदित्य पुसलवार,हेमंत आत्राम,राहुल दुर्गे,अजय सडमेक,सुमित झाडे,पाऊल पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणातून माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील युवक व युवतींच्या अंगी असलेल्या कला गुणांना वावं मिळवून देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात आदिवासी विद्यार्थी संघाकडून विविध खेळांचे आयोजन केले जात अनेक सामन्यांना पुरस्कारही दिले जात असून यापुढे सुद्धा क्रिडा स्पर्धांच्या आयोजनासाठी माजी आमदार दिपक दादाकडून व माझाकडून खेळाडूंना सर्वतोपरी मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अहेरी शहरात आयोजित या टेनिस बॉल क्रिकेट सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून, द्वितीय पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम कडून तर तृतीय पुरस्कार नगरपंचायतचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन यांच्याकडून ठेवण्यात आले. या क्रिकेट सामन्याचे उदघाटन समारंभाचे संचालन व आभार प्रदर्शन बबलू सडमेक यांनी केले. या उदघाटन समारंभाला शहरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.