चंद्रपूर जिल्हासामाजिक

चंद्रपुर येथे भारतीय संस्कृती व घटस्फोटाची दाहकता या विषयावर चर्चासत्र संपन्न

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क


चंद्रपूर: भारतीय परिवार बचाव संघटना चंद्रपूर तर्फे एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले यात “भारतीय संस्कृती व घटस्फोटाची दाहकता” या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. यात अनेकांनी आपल्या व्यथा मांडल्या कुटुंब कसे देशोधडीला लागते. स्वतःचे करिअर खराब होते. मुलांचे भविष्य कसे अंधकारमय होते व आई वडील यांना वृद्धाश्रमात ठेवावे लागते घटस्फोट हे कुटुंबाला लागलेले कीड यावर विचार मंथन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष नरुले भारतीय परिवार बचाव संघटनाचे जिल्हाध्यक्ष डॉ नंदकिशोर मैंदळकर, सचिन बरबटकर, गंगाधर गुरणुले, सुदर्शन नैताम, मोहन जीवतोडे, वसंता भलमे, पिंटू मुन, धम्मदीप दुर्गे, गौरव अक्केवार, प्रदीप गोविंदवार, विनोद करमरकर, मनोज ताटे, स्वप्निल गावंडे, नितीन चांदेकर, रफिक शेख, मोहब्बत खान, आदी उपस्थित होते.
जगात भारतीय संस्कृती श्रेष्ठ मानल्या जाते परंतु भारतीयांनी पश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करून पदरी निराशाच पाडली आहे. घटस्फोट हा संस्कृतीला लागलेला कलंक आहे. त्यामुळे विवाह संस्था धोक्यात येत आहे. लग्न हे पवित्र बंधन मानले जाते कोणत्याही कठीण परिस्थितीत विवाह बंधन टिकवून ठेवणे ही तारेवरची कसरत असते भारतात दररोज लाखो लोक विवाह बंधनात अडकतात तसेच अनेक लोक घटस्फोटही घेत असतात. जगात घटस्फोटाचे प्रमाण वाढतच आहे. लक्झमबर्ग मध्ये 87% स्पेन मध्ये 65% फ्रान्समध्ये 55% रशियामध्ये 51% अमेरिकेमध्ये 46 टक्के लोक घटस्फोट घेतात. तर भारतात 1000 जोडप्यातून 13 जोडप्यामध्ये घटस्फोट होतात यात प्रेमविवाह केलेल्या मध्ये 5 टक्के तर अरेंज मॅरेज मध्ये 0.8% आता लिव्ह इन रिलेशन मधेही घटस्फोट होत आहे. विवाह विच्छेदाचे बरेच कारण आहेत मोबाईल मुळे संवाद कमी होणे. एकमेकांचा आदर नसणे. गरजेपेक्षा जास्त अपेक्षा. सहानुभूती, आदर सन्मान नसणे. विवाहोत्तर संबंध. जीवनशैलीतील बदल. लिव्ह इन रिलेशनशिप. कुटुंबाची चिंता नसने स्वतःच्या करिअरची चिंता करणे.ही कारणे घटस्फोटात महत्त्वाची भूमिका बजावतात मोबाईलच्या अतिवापरामुळे संवाद कमी होतो पतीच्या वृध्द माता-पित्यांना घरात राहण्यास मनाई करणे. त्यांना वृद्धाश्रमात पाठविणे. पतीच्या नातेवाईकांचा अपमान करणे. आदी करणानेही विवाह विच्छेद होताना दिसतात. या प्रकरणामुळे कुटुंबाच्या कपाळावरही चिंतेच्या रेषा उमटू लागले आहेत. विवाह विच्छेद करताना हजार वेळा विचार करावा असा सुवर्णकाळ पुन्हा येणे नाही उर्वरित जीवनात संकटाचा डोंगर आ वासून उभा असतो त्याला सामोरे जाताना समाजाचाही सामना करावा लागतो. घटस्फोटातील व्यक्तीला समाज स्वाभिमानाने जगू देत नाही. याचा विचार करून प्रत्येक दांपत्यांनी घटस्फोटापासून परावृत्त व्हावे व जीवनाचे काही आनंदी व सुखद भविष्याचा आनंद घ्यावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close