सिरोंचा तालुका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(शरद पवार)गटाचे सिरोंचा तालुका अध्यक्षपदी फाजील पाशा यांची नियुक्ती …

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

सिरोंचा तालुका मुख्यालय येथे नुकताच येथील इंदिरा गांधी चौकात तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरद पवार)गटाचे नवनियुक्त जिल्हाअध्यक्ष अतुल भाऊ गण्यारपवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांचे बैठक घेण्यात आली.
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अतुल भाऊ गण्यारपवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्रजी पवार,प्रांतअध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनात आपल्या सर्वांना पक्ष मजबुतीकरण करण्यासाठी काम करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच याबैठकीत सिरोंचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) नवीन पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कार्यकारणी तयार करण्यात आली.
या नवीन कार्यकारणीत जिल्हा अध्यक्ष अतुल भाऊ गण्यारपवार यांनी सिरोंचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष म्हणून फाजील पाशा यांच्या यांची निवड करण्यात आली. या निवडीने नवनियुक्त तालुका अध्यक्ष पाशा यांची सर्वस्तरावर अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close