अहेरी तालुकाधार्मिक कार्य

आल्लापल्ली येथील श्रीकृष्ण मंदिरात जन्माष्टमी कार्यक्रमाला अजयभाऊ कंकडालवार दांपत्याची उपस्थिती..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी : आलापल्ली येथील श्रीकृष्ण मंदिरात दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडलावार व अहेरी माजी पंचायत समिती माजी उपसभापती सोनालीताई अजय कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून भगवान श्रीकृष्णाची दर्शन घेऊन विधिवत पुजा अर्चना करून मंदिराच्या बांधकामासाठी देणगी दिली. यावेळी कंकडालवार दाम्पत्यांनी सर्व शेतकरी आणि नागरिकांवरील संकट दूर करून निसर्गाची कृपादृष्टी सर्वावर राहावी यासाठी त्यांनी  प्रार्थना केली. यावेळी मंदिरात भजन कीर्तनाला मोठ्या संख्येने  भाविक उपस्थित होते.Pमंदिराकडून मटका फोड दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते या दहीहंडी कार्यक्रमाला येथील अनेक गोविंदा संघांनी सहभाग घेतले आणि दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

आल्लापल्ली येथील भगवान श्रीकृष्ण मंदिरात कंकडालवार दांपत्य दर्शन घेताना व मंदिराला आर्थिक दान करतांना ग्रामपंचायत सदस्य मनोज बोल्लूवार,केसनवार काकाजी,बिटपल्लीवार,जल्लेवा मंथनवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील भक्तगण मोठ्या संख्येनेउपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close