भामरागड तालुक्यातील आरेवाडा ते हितापाडी गावात पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतंर्गत झालेल्या रस्त्याची बांधकाम नित्कृष्ठ दर्जाचे…!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
भामरागड : तालुक्यातील आरेवाडा ते हितापाडी या रस्त्याचे काम काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेअंतर्गत पूर्णत्वास आली असून रस्त्याचे बांधकाम नित्कृष्ठ दर्जाचे झाल्याने या पावसाळ्यात या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने डबके झाल्याची दिसत आहे.कारण सदर रस्ता शासनाच्या अंदाजपत्रका नुसार न करता नियम अटी नुसार न बनवता ठेकेदार आपल्याच मनमर्जी पद्दतीने डांबरीकरण केली. मात्र पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यावरील टाकलेली डांबर उखुडुन जात आहे. या रस्तावरून वाहतूक करतांना रस्त्यावर भेगा पडत आहेत.या कामांची देखभाल व दुरुस्ती 5 वर्षीची असून सुद्धा आता पर्यंत त्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेला नाही.तरी संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करण्यात यावी व कामाची योग्य चौकशी करून नित्कृष्ठ दर्जाचे काम केलेल्या कंत्राटदारांवर योग्य कारवाई करण्यात यावी म्हणून येथील नागरिकांनी अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रार केले होते. परंतु नागरिकांच्या तक्रारीकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले होते.
म्हणून आज या गावातील नागरिकांनी आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी येथे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांची भेट घेऊन सदर रस्त्याची करून संबंधित कंत्राटदारावर योग्य कारवाई करण्यात यावी म्हणून संबंधित विभाग व सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी दिली आहे. यावेळी कंकडालवार यांनी गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदन पाठपुरावा करण्याचे नागरिकांना आश्वासन दिले.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,राकेश सडमेक,नरेश गर्गम,ग्रामसभा हितापाडी गावातील रैनू नरगो पुगाटी,कार्वे नरगो पंगाटी,देवाजी महारू पंगाटी,सोमजी देवू पूगाटी,भीमा नरगो पुगाटी,रैनू पुसू पुंगाटी,जुरू दसरू पुंगाटी,किशोर डुरा परसा,रामा गोंगलु पुंगाटी,पांडू गोंगलु पुंगाटी,राजू कुमा परसा,प्रमोद गोडसेलवार,प्रकाश दुर्गेसह गावातील नागरिक तसेच आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.