जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार कडून इंदारम येथील आत्राम व संन्ड्रा येथील गावडे आणि मलमपल्ली येथील मडावी कुटुंबियांची सांत्वन व आर्थिक मदत..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहे
री..गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी विविध गावांमध्ये आकस्मिक निधन झालेल्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट देऊन त्या कुटुंबियांची सांत्वन करून मृतकाचे कुटुंबियांना आपल्या परीने आर्थिक मदत करून कमावत्या व्यक्तींच्या निधनाने संसार उघड्यावर पडलेल्या कुटुंबांना मदतीचे हात देऊन त्यांना धीर दिला आहे. इंदाराम (गेर्रा) येथील रहिवासी सुरेश आत्राम यांच्या अचानक निधन झाला होता.माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी त्या कुटुंबियांची सांत्वन पर भेट देऊन त्यांना आर्थिक मदत दिले.तसेच संन्ड्रा येथील विशाल गावडे यांची अचानकपणे दुर्दैवी निधन झाले.या दुःखद घटनेची माहिती मिळताच कंकडालवार यांनी गावडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट देऊन त्यांना आर्थिक मदत दिली. तसेच मलमपल्ली येथील आविकाचे सदस्य देवेंद्र मडावी यांचे पत्नीचे दुःखद निधन झाले होते.माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी इथेही भेट देऊन मडावी कुटुंबाचे सांत्वन करून आर्थिक मदत.या तिन्ही ठिकाणी आदिवासी विद्यार्थी संघाचे व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून अहेरी विधानसभा क्षेत्रातील दुःखी,बाधित व आपद्ग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदतीचे निरंतर कार्य सुरूच आहे.