
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी : शहरातील इंदिरानगर येते बेघर कॉलनी येथील सुरेश आलम यांना कर्करोग ग्रासले होते.त्यांची घरची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांना पुढील उपचार घेण्यासाठी अडचण भासत होते.कर्करोग रुग्ण सुरेश आलम यांना बिमारीवर अर्धवट उपचार करून पैशांअभावी नागपूर रुग्णालयातुन परतावे लागले. बाधितआत्राम कुटुंबातील नातेवाईकांनी ही अडचण आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष व अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना सांगण्यात आला होता.बाधित आत्राम कुटुंबियांचे आर्थिक अडचण बघून गोर गरीब जनतेचे आधार असलेले अजभाऊ कंकडालवार यांनी कर्करोग रुग्ण सुरेश आत्राम त्यांना पुढील उपचार औषधसाठी आर्थिक मदत केली . यापुढे ही काही आर्थिक अडचण आल्यास माझासोबत नक्कीच संपर्क करावं म्हणून आत्राम कुटुंबातील नातेवाईकांना त्यांनी सांगितले.
बाधित आत्राम कुटुंबाला आर्थिक मदत करतांना माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.अध्यक्ष अजय नैताम,माजी सभापती सुरेखा आलम,माजी जि.प.सदस्य सुनीता कुसनाके,नरेश गर्गम,लक्ष्मण आत्राम,राकेश सडमेक,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.