अहेरी तालुका

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दिली उपजिल्हा रुग्णालयाला आकस्मिक भेट …!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी : आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व जि.प.माजी अध्यक्ष आणि अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी काल अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयाला आकस्मिक भेट देऊन रुग्णालयात भरती होऊन उपचार घेत असलेल्या रुग्णांची तब्येतीची आस्थेने विचारपूस करून रुग्णाच्या नातेवाईकांसोबत चर्चा करून त्यांची अडी अडचणी जाणून घेतल्या.तसेच डॉक्टरांसोबत याठिकाणी उपचार घेत असलेल्या प्रत्येक रुग्णाच्या तब्यतीबद्दल व आरोग्य विषयी माहिती जाणून घेतले.

यावेळी माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना काही अडी अडचणी असल्यास मदतीसाठी संपर्क करण्याचे सांगितले असता यावर रुग्णांनी व त्याचे नातेवाईकांनी अजयभाऊ कंकडालवार यांच्याप्रती समाधान व्यक्त केले.

या आकस्मिक दौऱ्याप्रसंगी जिल्हा प्रमुख( उद्धव गट शिवसेना )रियाज शेख,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेक,प्रमोद गोडसेलवार,प्रकाश दुर्गेसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच डाक्टरबंधू आणि रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close