Gamesअहेरी तालुका

येल्ला येथील क्रिकेट सामन्याचे जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

मुलचेरा : तालुक्यातील येल्ला येथील जय गंगा माता क्रिकेट क्रीडा मंडळ येल्ला यांच्या वतीने भव्य टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आला होता.सदर स्पर्धेचे उदघाटन आविसं – काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी यांचे हस्ते करण्यात आला.

या क्रिकेट स्पर्धेचे सहउदघाटक म्हणून येल्ला येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव आत्राम तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून येल्ला ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच होते.

सदर क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक 21001/-रु तर द्वितीय पारितोषिक जिल्हा परिषद शाळा येल्ला आणि सामाजिक कार्यकर्ते नामदेव आत्राम यांच्या कडून 15001 रु.देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक विमलाताई ओल्लालवार शाळा येल्ला आणि ग्रामसेवक प्रदीप गेडाम प्र.ना.लिंगाजी टेकुलवार प्रा.ना.साईनाथ पानेमवार यांच्या कडून 10001/-देण्यात येत आहे.

यावेळी आविसं व काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मंडळाचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close