जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सत्कार..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून राज्यातील 288 विधानसभा क्षेत्रांचे निवडणूक प्रभारी पदांचे घोषणा करण्यात आली.यात अहेरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाकडून प्रभारी म्हणून अजयभाऊ कंकडालवार यांचा नावाची घोषणा करण्यात आली.या घोषणेने गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षात सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण झालेल आहे.
या निवडीचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरद पवार गट ) सेवादल संघटना प्रदेश सचिव बुधाजी सिडाम व इतर पदाधिकाऱ्यांनी आज काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन त्यांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार करत काँग्रेस पक्षात पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.
यासत्कारा दरम्यान करतांना माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रा.पं.चे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रमोद गोडसेलवार आदी उपस्थित होते.