पोलीस विभागाच्या वतीने रेला नृत्य स्पर्धेचे आयोजन !

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क
◆आदिवासी बांधवांना कला,गुणांना वाव देणारी व्यासपीठ
सिरोंचा:-आदिवासी बांधवांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यास उपविभागीय पोलीस कार्यालय हद्दीतील पोलीस स्टेशन सिरोंचा येथे भव्य रेला नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनातून उपविभागीय स्तरावर रेला नृत्याचे आयोजन करण्यात आली.
आज घेण्यात आलेल्या रेला नृत्य सोर्धेत प्रथम विजेते – विर बाबुराव शेडमाके रेला नृत्यसंघास 7000/- रु रोख, द्वितीय विजेते- चिट्टूर रेलानृत्य संघ पोस्टे असरअल्लीस- 5000/- रु.रोख,तृतीय विजेते बिरसा मुंडा रेला नृत्य संघ येनलाया उपपोस्टे बामणीस- 3000/- रु.रोख बक्षीस देण्यात आले.
रेला नृत्य कार्यक्रमाला आलेल्या सर्व कलाकार व पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
रेला नृत्य कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस कार्यालय व पोलीस स्टेशन सिरोंचाचे कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.