पातागुडमचे मांतय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर…!
दिल्ली येथे शिक्षकदिनी पुरस्काराने सन्मानित होणार..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …प्रतिनिधी..
गडचिरोली दि. 27: एटापल्ली तालुक्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मांतैय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह तसेच शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी श्री बेडके यांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून त्यात कोल्हापूर येथील सागर बगाडे व गडचिरोली जिल्ह्यातील एम. ए. बि. एड. असलेले मंतैय्या बेडके यांचा समावेश आहे.
५ सप्टेबर रोजी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात श्री बेडके यांना रजत पदक व ५० हजार रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक मांतय्या बेडके हे सिरोंचा तालुक्यातील पातागुडमचे मूळ रहिवासी आहेत.या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.